Shivsena News : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्यात जोरदार राडा; ठाकरेंचे शिवसैनिक भिडले!

Politcal News : यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
Thane news
Thane news Sarkarnama
Published on
Updated on

Thane News : ठाकरे गटाच्या वतीने रविवारी ठाण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आनंदआश्रमासमोर ठाकरे-शिंदेंची सेना आमने-सामने आली. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

आनंदआश्रमासमोरील आनंद दिघे यांच्या पुतळ्याला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अभिवादन केले. त्यानंतर शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी राऊत यांनी पुतळयाला घातलेला हार शिंदे यांच्या शिवसैनिकांनी काढून टाकत अभिषेक करण्यात आला .

Thane news
Shivsena UBT Politics: शिवसेना ठाकरेंचे आंदोलन महापालिकेविरोधात, संताप झाला भाजपचा, काय आहे प्रकरण?

एकनाथ शिंदे (Ekanth shinde) यांच्या ठाणे बालेकिल्ल्यात शिवसेना उबाठाचा मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी खासदार संजय राऊत दाखल झाले आहेत. शिंदे सेनेच्या नेत्यांकडून ठाकरे सेनेच्या नेत्यांना विरोध केला जात आहे. ठाण्यात दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आले आहेत.

Thane news
BJP-Shivsena News : सत्तार, लोणीकरांना निवृत्तीचे वेध ? तर रावसाहेब दानवे अजूनही मैदानात!

आनंद आश्रम परिसरात शिवसेना (Shivsena) शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरा समोर आले आहेत. या ठिकाणी ठाकरे गटाला येण्यास शिंदे यांच्या शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली.

Thane news
Beed Santosh Deshmukh Murder : 'आका'वर मेहेरनजर? वाल्मिक कराड असलेल्या कारागृहातील CCTV बंद, देशमुख कुटुंबियांचा संशय बळावला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com