Ambads Danve On Eistimate Committee News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : महाराष्ट्रातील अंदाज समितीच संशयाच्या घेऱ्यात! अंबादास दानवेंनी टायमिंग साधले

In a sharp critique during the committee conference, Ambadas Danve accused the Maharashtra government of irregularities, claiming the state's committee is under suspicion. : साडेनऊ लाख कोटींचा कर्ज महाराष्ट्र राज्यावर आहे. या पार्श्वभूमीवर अंदाज समिती ज्या सूचना राज्य सरकारला देतील त्या महत्वाच्या असतील.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : राज्य सरकारचा निधी, त्यातून होणारी विकास कामे, त्यांची गुणवत्ता, दर्जा आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ पोहचतो का? यावर लक्ष ठेवून पारदर्शक कारभारासाठी आग्रह धरण्याचे काम अंदाज समितीचे असते. एकप्रकारे राज्याच्या विकास कामात कुठे काही गैरप्रकार, भ्रष्टाचार होणार नाही, यावर अंकुश ठेवून तो रोखण्यात या समितीची महत्वाची भूमिका असते. परंतु महाराष्ट्रातील हीच अंदाज समिती सध्या संशायाच्या फेऱ्यात अडकली आहे. तो संशय दूर करावा लागेल, असे स्पष्ट मत शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.

अंदाज समिती एक वॉच डॉग म्हणून काम करते. या समितीच्या मंजुरी शिवाय एक रुपया पैसा खर्च करू शकत नाही. बजेटचा सदुपयोग काय झाला दुरुपयोग काय झाला? काय त्याची कारण आहे? हाच ठोस निर्णय किंवा निष्कर्ष काढण्याचं काम अंदाज समिती करते. महाराष्ट्रातील अंदाज समितीमध्ये काही गुण असतील काही दोष असतील असेही दानवे (Ambadas Danve) म्हणाले. भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला 75 वर्षे पूर्ण होत असून या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद महाराष्ट्र विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आली. यावेळी अंबादास दानवे यांनी भाष्य केले.

साडेनऊ लाख कोटींचा कर्ज महाराष्ट्र राज्यावर आहे. या पार्श्वभूमीवर अंदाज समिती ज्या सूचना राज्य सरकारला देतील त्या महत्वाच्या असतील. (Shivsena UBT) आताची महाराष्ट्रातील अंदाज समिती ही संशयाच्या घेऱ्यात आली आहे. हा संशय दूर करण्याचे काम आता करावे लागेल.संशयाच्या घेऱ्यात असलेली महाराष्ट्राची अंदाज समिती आणखी मजबूत होईल आणि सरकारवर त्यांचा अंकुश राहील, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही अंबादास दानवे यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

अंदाज समिती सदस्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप आणि रोख पैसे सापडल्याचे प्रकरण नुकतेच धुळे येथील शासकीय विश्रामगृहात उघडकीस आले होते. आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहायकाकडे पावणे दोन कोटींची रोख रक्कम सापडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी राज्य सरकारच्या अंदाज समिती व त्यातील सदस्यांवर निशाणा साधला.

हिंदी सक्ती ही वैचारिक दिवाळखोरीच..

दरम्यान, राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत टीका केली. केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयाला मान डोलावणारे राज्य सरकार केंद्राचे पोस्टमन झाल्याची टीका त्यांनी केली. अभिजात भाषेचे घर असलेल्या महाराष्ट्रात हिंदी सक्ती बद्दल मंत्र्यांमध्ये चर्चा तरी कशी होऊ शकते? असा सवाल त्यांनी केला.

मा.बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचे ढोंग करणारे मंत्री हिंदी सक्तीचे फतवे काढतात ही त्यांची वैचारिक दिवाळखोरीच आहे. खरं तर, राज्य सरकार केंद्राचे पोस्टमन झाले आहे. केंद्राचे निर्णय विनाविचार राज्याच्या माथी मारायचे एवढंच सध्या सुरू आहे. याचे चटके सरकारला जरूर बसतील. मोदी-शाह बोले, भाऊ-भाई-दादा हले, अशी राज्याची अवस्था झाली आहे, असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT