Assembly Election Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad Central Assembly Election : मतदानाआधीच एमआयएमच्या उमेदवाराची पोलिसांकडे तक्रार; 'ही' भीती केली व्यक्त

Naser Siddiqui files complaint in Aurangabad Central constituency: औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दीकी यांनी निवडणूक विभाग आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : मतदानाला अवघे काही तास उरलेले असतांना औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दीकी यांनी निवडणूक विभाग आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत काही गुंड प्रवृत्तीचे लोक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जावेद कुरेशी यांनाच मतदान करा, म्हणून मतदारांना धमकावत असल्याचे म्हटले आहे. शिवाय मतदारसंघातील काही भागात बुथ कॅप्चरिंगचा प्रकार घडू शकतो, अशी भीती एमआयएमच्या नासेर सिद्दीकी यांनी आपल्या तक्रारीत व्यक्त केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ वीस दिवस आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. सोमवारी (ता. 18) सायंकाळी पाच वाजता प्रचार संपला असला तरी आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. एमआयएम पक्षाच्या उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिसांकडे मध्य मतदारसंघात बूथ कॅप्चरिंगचा धोका असल्याची तक्रार केली आहे. काही गुंड प्रवृत्तीचे लोक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जावेद कुरेशी यांना मतदान करा, म्हणून धमकावत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

मध्य मतदारसंघात 24 उमेदवार रिंगणात असून, त्यात शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप जैस्वाल, एमआयएम पक्षाचे नासेर सिद्दीकी व शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात मतदानाला काही तास शिल्लक असताना देखील आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

मंगळवारी (ता. 19) एमआयएम (AIMIM) पक्षाचे उमेदवार नासेर सिद्दीकी यांनी पोलिस व निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार करून मतदरासंघात शस्त्रासह येऊन बूथ कॅप्चरिंगची भिती व्यक्त केली आहे.जावेद कुरेशी यांना मतदान न केल्यास पाहुन घेतो, अशी धमक्या महिला मतदरांना दिल्या जात आहेत.

या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. नौशाद कुरेशी, सिराज कुरेशी, जहीर कुरेशी, असजाद कुरेशी, वाजेद कुरेशी, मुजाहीद कुरेशी (रा. सर्व सिल्लेखाना) यांच्याकडून धमक्या सुरू असल्याचे सिद्दीकी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT