Kiri Somaiya In Sillod News Sarkarnama
मराठवाडा

Kirit Somaiya News : भाजपाच्या किरीट सोमय्या यांच्याकडून आणखी एका 'आका'चा उल्लेख!

BJP leader Kirit Somaiya embarks on his fourth visit to Sillod to investigate the mastermind behind fake birth certificates. : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येने महाराष्ट्र सुन्न झाला, तर या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मीक कराड याचा उल्लेख धस यांनी आका असा उल्लेख केला होता.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रातील बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांच्या विरोधात मोहिम हाती घेतली आहे. महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरांना बोगस आधार कार्ड, कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले असून ही संख्या लाखांच्या घरात असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. यासाठी ते राज्यभरात दौरे करून अशा जन्म प्रमाणपत्रांची चौकशी करण्याची मागणी करत आहे.

या शोधमोहिमेअंतर्गतच किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गेल्या दोन महिन्यात चौथ्यांदा सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचा दौरा केला. उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी राजकीय दबावातून केवळ आधार कार्डचा पुरावा ग्राह्य धरून शेकडो बोगस जन्म प्रमाणपत्रांचे वाटप केल्याचा आरोप सोमय्या यांनी अगदी आपल्या पहिल्या सिल्लोड दौऱ्यापासून केला होता.

याची सगळी कागदपत्र सोमय्या यांनी पोलीस आणि नगरपरिषद प्रशासनाला दिली. एवढे नाही, तर एसडीएम लतीफ पठाण यांना निलंबित करण्याची मागणीही मुख्यमंत्र्‍यांकडे केली. याच प्रकरणात आता (Sillod) सिल्लोडच्या 'आका'ला सोडणार नाही, असा इशारा सोमय्या यांनी दिला. भाजपाचे आष्टी-पाटोदा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी राजकारणात आका या शब्दाला चर्चेत आणले.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येने महाराष्ट्र सुन्न झाला, तर या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मीक कराड याचा उल्लेख धस यांनी आका असा उल्लेख केला होता. तर ज्या धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक, राईट हॅन्ड म्हणून कराड ओळखला जातो, त्या धनंजय मुंडे यांचाही उल्लेख धस आकाचा आका, असा करतात.

किरीट सोमय्या यांनीही सिल्लोडमधील आकाचा उल्लेख करत खळबळ उडवून दिली आहे. शिवसेनेचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड-मतदासंघात विधानसभा निवडणुकीआधी मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप भाजपाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केला होता. पंचवीस हजाराहून अधिक बोगस नावे असल्याचा दावा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता.

यात कुठलीही कारवाई झाली नाही, त्यानंतर किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा सिल्लोडकडे वळवला आणि बांगलादेशी घुसखोरांना बोगस जन्म प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आल्याचा आरोप आणि त्याचे पुरावे सादर केले. एवढेच नाही तर आपल्या तक्रारीचे पुढे काय झाले यासाठी तब्बल चारवेळा सिल्लोडचा दौरा केला.

एसडीएम लतिफ पठाण यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी सोमय्या यांनी केली होती. आता पहिल्यांदा त्यांनी सिल्लोडच्या आकाला सोडणार नाही, असे म्हणत आपल्याला सिल्लोडचे मालेगाव होऊ द्यायचे नाही, असे म्हटले आहे. किरीट सोमय्या यांनी सिल्लोडचा आका म्हणून कोणाच्या नावाचा उल्लेख केला नसला, तरी त्यांचा इशारा आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांचा अवघ्या 2420 मतांनी विजय झाला होता. महाविकास आघाडीच्या सुरेश बनकर यांनी सत्तार यांना जेरीस आणले होते. तेव्हापासून भाजपाने सत्तारविरोधी मोहिमेला सिल्लोडमध्ये वेग दिला आहे. त्यात किरीट सोमय्या महत्वाची भूमिका बजावत आहेत.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT