Aimim News : महापालिकेत भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यापासून विरोधी पक्ष एमआयएमसोबत त्यांचे खटके उडत आहेत. स्थायी समिती सभापती यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महापौर, सभापतींनी सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना निधी वाटपात झुकते माप दिले. तर एमआयएमच्या नगरसेवकांना तुटपुंजा निधी दिला. यावर इम्तियाज जलील यांनी महापौर, सभापती यांना सुनावले.
महापालिकेत भाजप (BJP)-शिवसेनेची सत्ता असल्यामुळे सहाजिकच त्यांनी आपल्या नगरसेवकांना अतिरिक्त निधी दिला आहे. कोणताही सत्ताधारी पक्ष हेच करतो. परंतु माझे महापौर, सभापतींना आवाहन आहे, की त्यांनी निधी वाटपात कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सगळ्यांना समान निधी द्यावा. आपल्या संपूर्ण शहराचा विकास करायचा आहे, केवळ एका भागाचा नाही.
आमचे विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी निधी वाटपातील भेदभावाबद्दल महापालिकेच्या सभागृहात भक्कमपणे बाजू मांडली. त्यानंतर आम्हाला आशा आहे, की महापौर, सभापती हे निधी वाटपामध्ये झालेला भेदभाव नाहीसा करून दुरुस्ती करतील. निधी वाटपात भेदभाव केला तर शहराच्या एका भागाचा विकास होऊन ते पुढे निघून जाईल, आणि दुसरा भाग अविकसित राहील, याकडेही सत्ताधारी भाजपा-शिवसेनेचे लक्ष वेधले.
छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख न करता एमआयएमच्या नगरसेवकांनी निधी मागणी पत्रावर औरंगाबाद असाच ठळक उल्लेख केल्याने सभापती अनिल मकरिये यांनी निधी नाकारला होता. विकास निधी पाहिजे असेल तर मागणी पत्रावर छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करा, नाहीतर विकासाची कामे होणार नाहीत, असा इशारा स्थायी समितीच्या बैठकीत दिला होता.
अर्थसंकल्प सादर केल्यानंतर नगरसेवकांना देण्यात आलेल्या निधीचे आकडे जेव्हा समोर आले, तेव्हा सभापती मकरिये यांनी आपला इशारा खरा करून दाखवल्याचे दिसून आले. एमआयएमच्या नगरसेवकांना कमी निधी देणाऱ्या सभापतींनी वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांना निधी देतांना मात्र सढळ हस्ते दिल्याचा आरोपही एमआयएमकडून करण्यात आला होता.
गेल्या सर्वसाधारण सभेत यावरून एमआयएम, वंचित बहुजन आघाडी व भाजपच्या नगरसेवकांमध्ये मोठा गदारोळ झाला होता. एकमेकांना आव्हान देण्याची भाषा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी पहिल्यादांच भाष्य करत निधी वाटपात दुरूस्ती करण्याची मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.