Parbhani Riot  Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Violence : जिल्हाधिकारी कार्यालयातही तोडफोड; परभणीत जमावबंदीचे आदेश, इंटरनेटही बंद!

Curfew Imposed in Parbhani After Violence :पोलिसांनी अश्रुधराच्या नळकांड्या फोडत जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतरही परिस्थिती अधिकच चिघळत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केला.

Jagdish Pansare

परभणी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याशेजारील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्या प्रकारानंतर परभणीत दंगल उसळली आहे.

मंगळवारी शहरात दगडफेक आणि वाहनांची जाळपोळीची घटना घडल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी परभणी बंद दरम्यान हिंसक घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरात ठिकठिकाणी जाळपोळ, दगडफेक, पोलिसांच्या वाहनांवर हल्ल्याचे प्रकार घडत आहेत.

पोलिसांनी अश्रुधराच्या नळकांड्या फोडत जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतरही परिस्थिती अधिकच चिघळत आहे. (Parbhani) या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केला असून इंटरनेट सेवाही बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परभणीचे जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शहरात जमाबंदीचे आदेश काढले आहे. पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई या आदेशानूसार बंदी करण्यात आली आहे.

आज दुपारी 1 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत ही जमावबंदी लागू राहणार आहे. याशिवाय टेलीफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र, ध्वनीक्षेपके आणि इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. (Marathwada) शहरातील वातावरण शांत व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलक,आंबेडकरी चळवळीतील नेत्यांशी संवाद साधत शांततेचे आवाहन केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातही संतप्त जमावाने तोडफोड केल्याचे समोर आले आहे. आंदोलक महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील काचा, दरवाजे, टेबल खुर्च्यांची तोडफोड केल्याचे समजते. आहे. काही वेळापूर्वी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि इतर आंदोलकांची बैठक घेऊन शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं.

दरम्यान ही घटना घडल्याने हे प्रकरण अधिक चघळल्याचे बघायला मिळाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानूसार परभणी शहरात ताण-तणावाचे वातावरण पाहता जिल्हयात कलम 37 (1) (3) प्रमाणे जमावबंदी आदेश लागु करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन परभणी शहर व जिल्ह्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 लावणे बाबत पोलीस अधिक्षक, परभणी यांनी विनंती केली आहे.

त्यानूसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 मधील प्राप्त अधिकाराचा वापर करुन परभणी शहर व जिल्हयामध्ये सार्वजनिक ठिकाणी पाच व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध करीत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे. याशिवाय सर्व टेलीफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके व इंटरनेट सेवा बंद ठेवणे बाबत आदेशीत करीत आहे.

हे आदेश कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 11.12.2024 रोजी दुपारीचे 1 वाजे पासून पुढील आदेशापर्यंत जमावबंदी व इंटरनेट सेवा बंद निर्णय लागु राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतीच्या प्रतिकृतीची काच सोमवारी सांयकाळी एका व्यक्तीने फोडली होती. त्यानंतर परभणीत दंगल उसळली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT