Beed, 17 February : संतोष देशमुख हे गेली दहा वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे बूथप्रमुख होते. त्यामुळे देशमुख कुटुंबीयांची भेट घ्यावी, त्यांच्याशी फोनवरून दोन शब्द सांत्वनाचे बोलणे, यापेक्षा धस आणि मुंडे यांच्यात भेट घडवून देणं, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना महत्वाचं वाटलं असेल. या गोष्टीचा मला खेद वाटतो. कुठल्याही राजकीय पक्षाचा पाया बूथप्रमुख असतो. पण, बावनकुळे यांचं हे वागणं... अशा शब्दांत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी धस-मुंडे भेट घडवून देणाऱ्या बावनकुळेंबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.
धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) म्हणाले, कुठल्याही राजकीय पक्षाचा पाया हा बूथप्रमुख असतो. पण, चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे वागणं...यावर मी कधीही बोलत नव्हतो. पण, गावकऱ्यांच्या ज्या भावना आहेत, त्या मी तुम्हाला बोलून दाखवत आहे.
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यात जी भेट घालून दिली, त्याचं मला एका गोष्टीचं दुःख वाटलं. (स्व.) संतोष देशमुख हे गेली दहा वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे बूथप्रमुख होते. देशमुख कुटुंबीयांची भेट घ्यावी, त्यांच्याशी फोनवरून दोन शब्द सांत्वनपर बोलणे, यापेक्षा धस आणि मुंडे यांच्यामध्ये भेट घडवून देणं बावनकुळेंना महत्वाचं वाटलं. या गोष्टीचा मला खेद वाटतो. याबाबत मी कधीही बोलत नव्हतो. पण, गावकऱ्यांच्या ज्या भावना आहेत, त्या मी तुम्हाला बोलून दाखवत आहे, असेही धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले.
संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुबीयांच्या भेटीचा चंद्रशेखर बावनकुळे यांनी जास्त विचार करायला हवा होता. पण, त्याऐवजी बावनकुळे यांनी दुसऱ्याच भेटी घालून देण्यामध्ये जादा इंटरेस्ट दाखवला, ही कोणालाही न पटणारी गोष्ट आहे, असा टोलाही धनंजय देशमुखांनी लगावला.
अजित पवार यांची विचार करण्याची क्षमता, त्यांनी जो काही विचार केला असेल तो त्यांना माहिती. मी त्याच्यावर बोललो तर आमचा जो न्यायालयाचा लढा आहे, त्याला कुठेतरी वेगळ्या भाषेत बोलल्यासारखे होईल. त्यामुळे त्याबाबत आम्हाला इंटरेस्ट नाही. जो आरोपी आहे, ज्यांनी हे आरोप पोसले आहेत, त्यावर आमचं लक्ष आहे. या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि देशमुख कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.
मराठा आरक्षणाचा लढा कधीही संपणार नाही
मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्व कमी करण्यासाठी सुरेश धस यांना पुढे करण्यात आले आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केले आहे. त्यावर धनंजय देशमुख म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अखंड मराठा समाज आहे. कोणी षडयंत्र केले तरी मराठा आरक्षणाचे आंदोलन, दिशा आणि व्हिजन हे कधीही संपणार नाही. कारण या लढ्यात उभा राहिलेला मराठा समाज आहे आणि या लढ्याला मदत करणारे इतर जाती धर्माचे लोक आहेत, ते या लढ्याला कुठेही थांबू देणार नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.