Dhananjay Munde, Ajit Pawar  sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde : मुंडेंचा राजीनामा घेणार की नाही? 'एनसीपी'च्या बैठकीत काय ठरलं? अजितदादांच्या जवळच्या नेत्याने दिली मोठी माहिती

NCP meeting update News : या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळे यांनी मोठे विधान केले आहे.

सरकारनामा ब्युरो

Beed News : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दीड महिन्यापेक्षा अधिक काळ झाला आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापले आहे. या प्रकरणात आतापर्यंत 7 जणांवर मकोका अतंर्गत कारवाई करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार आहे. या प्रकरणात अटकेत असलेले वाल्मिक कराडची प्रकृती अचानक बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळे यांनी मोठे विधान केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे मुंबईत दर मंगळवारी सर्व आमदारांची बैठक घेतात, या मंगळवारी त्यांची बैठक झाली. त्या बैठकीत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. परंतु, जर कोण मस्साजोग हत्या प्रकरणात दोषी असेल तर त्याच्यावर योग्य वेळी योग्य निर्णय पक्ष घेणार आहे, असे आमदार विक्रम काळे यांनी धाराशिवमध्ये प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

त्यासोबतच मस्साजोग या प्रकरणात कोणालाही आमचा पक्ष आणि राज्य सरकार पाठीशी घालणार नाही. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे वक्तव्य देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी केले आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आमदार विक्रम काळे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणी वाल्मिक कराडवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, वाल्मिक कराडला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना शंका उपस्थित केली आहे.

सुटून जायचे किंवा इतर सर्व षडयंत्र झाले असतील तर आता परत जेलमध्ये जावे, डॉक्टर नक्की कोणत्या तपासण्या करत आहेत, काय ऑपरेशन सुरू आहे? सुटून जायचं ऑपरेशन सुरू आहे का? पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांमध्ये नेमकं काय सुरू आहे? असे अनेक प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे त्याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT