Dhananjay Munde emotional statement about childhood Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde News : जन्मला आलो तसा संघर्ष, जन्मलो पण चार महिने डोळे उघडले नाही, जन्मताच लिव्हरचा त्रास, पण तुमच्या आशीर्वादाने जगतोय!

Dhananjay Munde speech about his birth struggle: जन्मला आलो तसा माझा संघर्ष सुरू आहे, जन्मलो पण चार महिने डोळे उघडले नाही, जन्मताच लिव्हरचा त्रास, पण तुमच्या आशीर्वादाने जगतोय, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

Jagdish Pansare

Dhananjay Munde childhood health problems: गेल्या सव्वा वर्षापासून मी गप्प आहे, तसा मी कोणाला घाबरत नाही, पण आपल्या गप्प बसण्याने एवढं घडत असेल तर बोलल्यावर काय होईल? असा सूचक इशारा आमदार धनंजय मुंडे यांनी भायाळा गावातील नारळी अखंड हरिनाम सप्ताहाच्या समाप्तीप्रसंगी दिला. जन्मला आलो तसा माझा संघर्ष सुरू आहे, जन्मलो पण चार महिने डोळे उघडले नाही, जन्मताच लिव्हरचा त्रास, पण तुमच्या आशीर्वादाने जगतोय, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

भायाळा गावातील नारळी अखंड हरिनाम सप्ताहात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी हजेरी लावली. या व्यासपीठावरून बोलताना धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. सर्वप्रथम त्यांनी भायाळा गावाला नतमस्तक होऊन अभिवादन करतो, भगवागनगडाला 4.5 कोटी आणि हिंदूवाहिनी संस्थेला 1 कोटी रुपये दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

तुमच्या कष्टाची एक एक पै गडाला दिली, त्याचा चांगला उपयोग महंत नामदेवशास्त्री बाबांनी केला. आज त्यांच्याच आदेशावरून भायाळा गावाला नारळी पौर्णिमेचा मान दिला. आज सप्ताहाची सांगता आहे, माझ्यावर सव्वा-दीड वर्षापासून येणाऱ्या संकटाची अनेकांनी आठवण काढली.

मी जन्माला आलो तसा संघर्ष आहे, जन्माला आलो चार महिने डोळेच उघडले नाही, जन्मताच लिव्हरचा त्रास, कसा जगलो माहित नाही. पण तुमच्या आशीर्वादाने मी जगतोय. या व्यासपीठावर हे बोलायचे नव्हते, सव्वा वर्ष मी बोललो नाही, पुढेही बोलणार नाही. आपल्या गप्प बसण्याने एवढं होतं, तर बोलल्यानंतर काय होईल? एकीकडे वेगळी चर्चा आपण पाहतोय, दुसरीकडे वारकरी सांप्रदाय, अध्यात्मिक व्यासपीठ असल्याचे सांगत संताच्या आदेशाने बोललो, असे मुंडे म्हणाले.

जात-पात धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी कशी जपायची हे या अध्यात्माने, वारकरी सांप्रदायाने व्यासपीठाने शिकवले. आज मा‍झ्या जन्म गावी सप्ताहाची समाप्ती आहे, गावाच्या लेकींनी घेतलेला सप्ताह आहे. धर्माचे बंधन झुगारून आमच्या गावाच्या लेकींनी या सप्ताहात हजेरी लावली आहे. ही खरी परंपरा आणि माणुसकी आहे.

माझे अभूतपूर्व असे स्वागत तुम्ही केले. मला रथात बसायचा आग्रह धरला, पण मी तो नम्रपणे मोडला. मला दीड वर्ष सोसावं लागला याचा राग तुमच्यात दिसत होता, तर दुसरीकडे मी इथे आलो त्याचा आनंदही दिसत होतो. आज या सप्ताहाच्या निमित्ताने महंतांनी मला येथे बोलावलं त्याबद्दल आभार.

हे अभूतपूर्व स्वागत पाहिले की लढायला बळ मिळतं, मी कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही. किती दगड हाणायचे तेवढे हाणू द्या, त्याचा शेवटचा दगड संपला की मग आपलं ठरवू, असा सूचक इशारा धनंजय मुंडे यांनी यावेळी दिला. हिंदूवाहिनी संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या हाॅस्पीटलसाठी तीन महिन्यात डायलिसीसच्या मशीन देतो, असे आश्वासनही धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT