Dhangar Reservation News  Sarkarnama
मराठवाडा

Dhangar Reservation News : रामराव वडकुते राज्यसभेवर गेले, अन् दीपक बोऱ्हाडेंनी धनगर आरक्षणाचा लढा तीव्र केला!

ST reservation demand Dhangar community News : धनगर समाजाला एसटीचे आरक्षण लागू करा, या मागणीसाठी एल्गार पुकारत आंदोलन छेडणारे दीपक बोऱ्हाडे यांनी आपला लढा पुन्हा तीव्र केला आहे.

Jagdish Pansare

Jalana News : महाराष्ट्रातून राज्यसभेवर धनगर आरक्षण लढ्यातील नेते रामराव वडकुते यांची भाजपने वर्णी लावली. धनगर समाजाला थेट दिल्लीत प्रतिनिधित्व आणि संधी दिल्याचा संदेश यातून दिला. मात्र, ही निवड होऊन आठवडा उलटत नाही तोच धनगर समाजाला एसटीचे आरक्षण लागू करा, या मागणीसाठी एल्गार पुकारत आंदोलन छेडणारे दीपक बोऱ्हाडे यांनी आपला लढा पुन्हा तीव्र केला आहे.

धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी करत धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे हे मुंबईकडे काल रवाना झाले होते. मुंबईतील आझाद मैदानावर सोमवारी सकाळी 10 वाजता दीपक बोऱ्हाडे हे उपोषणाला बसले असून धनगर आरक्षणाचा वणवा आता पेटला आहे. सरकारला तो रोखणे कठीण जाईल, असा इशारा बोऱ्हाडे यांनी मुंबईला रवाना होण्यापुर्वी दिला होता.

या आधी जालना येथे 17 सप्टेंबर 2025 रोजी दीपक बोऱ्हाडे यांनी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी उपोषण केले होते. त्यावेळी सरकारच्या वतीने बोऱ्हाडे यांना आश्वासन देऊन आंदोलन स्थगित करायला भाग पाडले होते. जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, मंत्री गिरीश महाजन यांनी बोऱ्हाडे यांच्या उपोषणाला भेट घेऊन त्यांना सरकारकडे मागण्या लावून धरण्याचा विश्वास दिला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) हे स्वतः दीपक बोऱ्हाडे यांच्याशी मोबाईलवरून बोलले होते. बोऱ्हाडे यांच्या मागणीनूसार त्यांना फडणवीस यांनी लेखी आश्वासन देत आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा शब्द देण्यात आला होता. परंतु पुढे या विषयावर ठोस काहीच झाले नाही.

21 जानेवारी रोजी उपोषणासाठी निघालेल्या बोऱ्हाडे यांना पोलीसांनी जालन्यातच रोखले होते. दरम्यान सरकारला गेली बारा वर्षे धनगर समाजाने वेळ दिला आहे, आता घटनादुरुस्त अधिकार मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नसल्याचा इशारा देत दीपक बोऱ्हाडे यांनी सोमवारी मल्हारराव होळकर जयंतीच्या दिवशीच मुंबईत धडक दिली आहे. विशेष म्हणजे खासदार रामराव वडकुते हे ही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT