Ministers absent budget session: विधानसभेत विरोधकांचा आक्रमक पवित्रा! कामगार मंत्री कुठे, बांधकाम मंत्री कुठे? सुनील प्रभूंच्या प्रश्नाने सभागृह गाजले

Political News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपचे आमदार व मंत्री यांना सभागृहात कामकाज सुरु असताना हजर राहणाच्या सक्त सूचना केली होती.
Sunil Prabhu
Sunil PrabhuSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधीमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात मंत्री गैरहजर राहत असल्याची टीका विरोधकांनी गेल्या आठवड्यात केली होती. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपचे आमदार व मंत्री यांना सभागृहात कामकाज सुरु असताना हजर राहणाच्या सक्त सूचना केली होती. मात्र, ही कानउघडणी करून आठवडा देखील उलटला नसतानाच सोमवारी विधानसभेत कामगार मंत्री कुठे आहेत, बांधकाम मंत्री कुठे आहेत? असा सवाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी केला. त्यामुळे सभागृहातील वातावरण पुन्हा एकदा तापले.

सभागृहात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात मंत्री गैरहजर राहत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. काही वेळा कॅबिनेट मंत्री नसेल तर त्या प्रश्नाचे उत्तर राज्यमंत्री देत होते. मात्र आता मंत्रीच उपस्थित राहत नसल्याने कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. सोमवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी सवाल उपस्थित केला होता.

Sunil Prabhu
Sangli Politics: सांगलीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, महायुतीतल्या आणखी एका घटक पक्षाचे सदस्य फुटले

यावेळी सभागृहात उत्तर देण्यास कामगार मंत्री, बांधकाम मंत्री हजर नव्हते. त्यामुळे आक्रमक झालेल्या आमदार प्रभू यांनी यावेळी कुठे आहेत कामगार मंत्री, कुठे आहेत बांधकाम मंत्री असा सवाल करीत चांगलेच धारेवर धरले. या मुद्द्यावरून नेते चांगलेच आक्रमक झालेले पाहावयास मिळाले.

Sunil Prabhu
Sangli ZP : ऑपरेशन लोटसला चकवा, सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता फिक्स! 36 सदस्य अज्ञातस्थळी

दुसरीकडे या वेळी याच मुद्द्यावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यावेळी मंत्री जर विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी हजर नसतील राहणार नसती तर सभागृह तहकूब करा, असा इशारा काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला. त्यामुळे यावेळी सत्ताधारी व विरोधक यावेळी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले.

Sunil Prabhu
MNS News: तीन मराठी कलाकार बनले मनसैनिक; राज ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश

मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा सभागृहात गाजत असताना आता याबाबत सत्ताधारी मंडळींकडून काय उपाययोजना केली जाते याकडे लक्ष लागले आहे. गेल्याच आठवड्यात असा प्रकार घडल्यानंतर त्याची दखल घेण्यात आली होती. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपचे आमदार व मंत्री यांची बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी सभागृहात कामकाज सुरु असताना हजर राहणाच्या सक्त सूचना करीत कानउघडणी देखील केली होती. त्यानंतरही असाच प्रकार घडत असल्याने काय कारवाई केली जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Sunil Prabhu
Sujay Vikhe : सुजय विखे म्हणतात, "स्पर्धेत नाही, पण सर्व्हे केल्यास माझंच नाव पुढे दिसेल" : राहुरी पोटनिवडणुकीत सर्व्हे पॅटर्ननं वाढवली रंगत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com