Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Shiv Sena fight : धाराशिव हादरलं! शिंदे गटात जाण्यास नकार देणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण

Shinde group vs Thackeray group News : शिंदे गटात जाण्यास नकार देणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांला बेदम मारहाण करण्यात आल्याचे समजते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामा ब्युरो

Dharashiv News : शिवसेनेत तीन वर्षापूर्वी उभी फुट पडली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार व 12 खासदार गेले. त्यावेळेसपासून शिवसेनेतील उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे या दोन गटात आडवा विस्तवही जात नाहीत. छोट्या-मोठ्या कारणाने या दोन गटातील नेते व कार्यकर्ते अनेकवेळा एकमेकांसमोर आले आहेत. त्यातच आता धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.

यामध्ये शिंदे गटात जाण्यास नकार देणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांला बेदम मारहाण करण्यात आल्याचे समजते. या जखमी झालेल्या कार्यकर्त्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केला आहे. प्रशांत साळुंके असे मारहाण झालेल्या ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) कार्यकर्त्यांचे नाव आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने गळा दाबुन त्यांना मारहाण केली. त्यासोबतच यावेळी त्यांनी शिविगाळ करीत लोखंडी रॉडने मारहाण असल्याने या जखमी झालेल्या कार्यकर्त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

धाराशिव शहरातील संभाजीनगर येथील काकडे प्लॉट परीसरात ही घटना घडली. या घटनेने धाराशिव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटात सामील का होत नाही? असा जाब विचारात प्रशांत साळुंके यांना शिंदे गटाच्या (Eknath shinde) सुदर्शन गाढवे, विनोद जाधव यांच्यासह इतर दोघांनी लोखंडी रॉडने मारहाण केली असल्याचे समजते.

त्यासोबतच प्रशांत साळुंके यांनी एका गुन्ह्यात साक्षीदार झाल्याच्या कारणावरून ही मारहाण केल्याचा आरोप सध्या केला जात आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीनंतर आरोपी सुदर्शन गाढवे, विनोद जाधव यांच्यासह इतर दोघांविरुद्ध आनंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोखंडी रॉडने मारहाण केल्याने प्रशांत साळुंके जखमी झाले आहेत. या मारहाणीत त्यांचा पाय फॅकचर झाला असून त्यांच्यावर धाराशिव शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास आनंदनगर ठाण्याचे पोलीस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT