Vaishnavi Hagawane Case: राष्ट्रवादीच्या नेत्याचं दुसरं कांडही समोर; मोठ्या सुनेचाही छळ; कपडे फाटेपर्यंत अमानुष मारहाण? धक्कादायक माहिती समोर

NCP Leader Rajendra Hagawane Crime News : मुळशी येथील हगवणे कुटुंबाची मोठी सून असलेल्या मयुरी हगवणे यांनी देखील सासू-सासरे आणि नणंदेकडून मारहाण आणि छळ झाल्यासंदर्भातील तक्रार नोव्हेंबर 2024 मध्ये पोलीस ठाण्यात दिली होती.
Vaishnavi Hagvane and Rajendra Hagvane .jpg
Vaishnavi Hagvane and Rajendra Hagvane .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ही आत्महत्या होती की हत्या याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातून ही हत्या असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मात्र, आता हगवणे कुटुंबीयांचे नवनवीन कारनामे समोर येऊ लागले आहेत. ज्या पद्धतीने वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane Death Case) यांच्यासोबत मारहाण करण्याचे प्रकार घडले असल्याचे समोर आले आहेत. त्याच पद्धतीने हगवणे यांच्या मोठ्या सुनेबाबतही अशाच प्रकारच्या मारहाणीच्या घटना घडल्या असल्याचं समोर आल्या आहेत.

मुळशी येथील हगवणे कुटुंबाची मोठी सून असलेल्या मयुरी हगवणे यांनी देखील सासू-सासरे आणि नंदेकडून मारहाण आणि छळ झाल्यासंदर्भातील तक्रार नोव्हेंबर 2024 मध्ये पोलीस ठाण्यात दिली होती. मयुरी हगवणे यांच्या तक्रारीनुसार याबाबत गुन्हा देखील दाखल झाला असल्याचं आता समोर आलं आहे.

या तक्रारीमध्ये मयुरी हगवणे यांनी सासू नणंद आणि सासऱ्यांनी मारहाण केल्याचे नमूद केला आहे. तसेच सासऱ्यांनी मारहाणी दरम्यान कपडे फाडून आपल्या मनात लज्जा उत्पन्न केली असल्याचा आरोप केला आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील राजकीय लागेबांधे असल्यामुळे हागवणे कुटुंबावर कोणतीही ठोस अशी कारवाई झाली नसल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.

Vaishnavi Hagvane and Rajendra Hagvane .jpg
Mahayuti Government: अवकाळी पावसाचा तडाखा; राज्य सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

5 नोव्हेंबर 2024 रोजी मयुरी या घरात असताना त्यांच्या सासू आणि मयुरी यांच्या पतीचे पैशावरून फोनवर बोलणे सुरू होते. त्यांचे फोनवरचे बोलणे झाल्यानंतर त्यांची सासू लता आणि नणंद करिष्मा यांनी घरामध्ये घुसून शिवीगाळ करत मयुरी यांना मारहाण केली. सासरे राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane ) यांनी देखील शिवीगाळ करत आपला ड्रेस फाडून मनात लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं. यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त केलं. तसेच घरात असलेले पैसे आणि दागदागिने देखील गायब करण्यात आला असल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला होता.

वैष्णवीचे आई-वडील काय म्हणाले..?

या घटनेबाबत सांगताना वैष्णवीचे आई-वडील म्हणाले ,अजित पवार आणि राजेंद्र हगवणेंचे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्यामुळेच वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी राजेंद्र हगवणे यांना अटक होत नाहीये, असं आम्हांला वाटत आहे. पण आता अजितदादांनी त्यांच्या लाडकी बहीण असलेल्या वैष्णवी हिला न्याय मिळवून द्यावा, अशी आमची मागणी आहे. आणि या मागणीसाठी गरज पडल्यास अजितदादांशी बोलण्याची आणि भेटण्याची तयारीही कस्पटे कुटुंबियांनी दाखवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com