Dharashiv News : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या धाराशिव जिल्ह्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. माजी मंत्री व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तानाजी सावंत शुक्रवारी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी त्यांच्या परंडा मतदारसंघातील काही गावांना भेटी दिल्या. यावेळी एका कार्यक्रमात तानाजी सावंत यांनी शिवसैनिकांना उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत गद्दारी केली तर ठेचून काढू, असा इशाराच त्यांनी दिला आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याची सध्या आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
आगामी काळात होत असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बंडखोरी करु नये, असे आवाहन केले. उमेदवारी हवी असेल आणि मिळाली नाही तर आपल्याकडून हवे तितके पैसे घेऊन जा. पण पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे निवडणुकीत काम करा, असे आवाहन तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केले.
जिल्हा परिषद निवडणूक आली आणि गेली, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही काय त्यासाठी जन्मलो नाही. सत्तेसाठी शिवसेना तर जन्मलेलीच नाही. विषयच नाही. आमचे ब्रीदवाक्यच आहे की, 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण. 80 टक्क्यात आम्ही कुठे कमी पडलो?, असा सवाल तानाजी सावंत यांनी यावेळी कार्यकर्त्यांना उद्देशून केला.
येत्या काळात धाराशिव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा (Shivsena) भगवा झेंडा फडवायचा आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे. सर्व कार्यकर्त्यांनी अंग झटकून काम करावे, असे आवाहन याप्रसंगी तानाजी सावंत यांनी केले.
'गद्दारी केली तर...'
"ज्याला वाटतेय मला सदस्य व्हायचे आहे, त्याने माझ्या केबिनमध्ये गुपचूप यावे. मी कुठेही ओपन करणार नाही. मला सांगावे की, साहेब, मला पाच वर्षाचे एवढे पैसे हवे आहेत. तुला रुपया लागतोय ना, दोन रुपये देतो तुला. पण त्याचे काम कर. गद्दारी करायची नाही. पण गद्दारी केली तर ठेचल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशाराच तानाजी सावंत यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.