Devendra Fadnavis Sarkarnama
मराठवाडा

Devendra Fadnavis : अंतरवाली सराटीतील लाठीचार्जचे आदेश फडणवीसांनी दिले ? 'ही' माहिती आली समोर...

Maratha Reservation Protest : 'स्थानिक स्थिती पाहून संबंधित अधिकारी निर्णय घेतात'

Sunil Balasaheb Dhumal

Jalna Political News : अंतरवाली सराटीत झालेला लाठीचार्ज गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांसह विरोधकांनीही केला होता. मात्र, हा निर्णय गृहमंत्रालयातून दिला नसल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून या लाठीचार्जचा आणि गृहमंत्रालयाचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या लाठीचार्जबाबत उलटसुलट चर्चांना सुरुवात झालेली आहे.

या लाठीचार्जबाबत आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि विरोधकांनी गृहमंत्री फडणवीसांना जबाबदार धरले. यानंतर फडणवीसांनी झालेल्या लाठीचार्जबाबत जाहीर माफीही मागितली. आता मात्र लाठीचार्जचे आदेश गृहमंत्रालयातून आले नसल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी माहिती अधिकारी कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी अर्ज केला होता. त्यानुसार जालना जिल्हा माहिती अधिकारी आर. सी. शेख यांनी माहिती दिली आहे. यातून अंतरवाली सराटीतील लाठीचार्जचे आदेश गृहमंत्रालयातून दिले नव्हते, असे सांगण्यात आले आहे.

मराठा समाजाला ओबसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी 29 ऑगस्ट 2023 पासून अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी 1 सप्टेंबर आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार करत लाठीचार्ज केला होता. यात काही आंदोलक गंभीर जखमी झाले होते, तर आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीतही अनेक पोलिस जखमी झाले होते. यानंतर मराठा समाज आक्रमक होत राज्यभर आंदोलनाचे लोन पसरले.

याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अशा प्रकारे कुठे बळाचा वापर करायचा आणि कुठे नाही, ते घटनास्थळावरील स्थिती पाहून संबंधित प्रमुख अधिकारी घेतात. ते निर्णय घेताना गृहमंत्र्यांना किंवा महासंचालकांना विचारून घेत नसतात. यात काहीही नवीन नाही. जे काही सत्य आहे तेच बाहेर आलेले आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT