Sandipan Bhumare- Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

Jalna Loksabha Constituency : जालना-संभाजीनगरात दानवे-भुमरेंचे 'एकमेका सहाय्य करू'ची भूमिका!

Jagdish Pansare

Jalna Loksabha News : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा लोकसभेच्या जालना मतदारसंघाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी पैठण विधानसभा मतदारसंघास महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. संदिपान भुमरे हे स्वतः छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आहेत. पैठण मतदारसंघ हा जालना लोकसभा मतदारसंघात येतो. (Jalna Loksabha Election 2024)

शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे पैठणमधून आतापर्यंत सहावेळा विधानसभा निवडणूक लढले आहेत. यापैकी पाचवेळा त्यांना विजय मिळाला आणि महाविकास आघाडी, महायुती अशा दोन्ही सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. पैठण विधानसभा मतदारसंघावर त्यांची मजबूत पकड असल्याने रावसाहेब दानवे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी महायुतीच्या मेळाव्यात केले.

यावेळी दानवे आणि भुमरे यांच्या बरीच चर्चा झाली. रावसाहेब दानवे यांनी जालना मतदारसंघात प्रचाराची दुसरी फेरी पुर्ण केली आहे. तर तिकडे संभाजीनगरात भुमरेंच्या प्रचाराला वेग आला आहे. रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा निवडून आले आहेत. यावेळी त्यांच्या सामना महाविकास आघाडीचे डाॅ. कल्याण काळे यांच्याशी होणार आहे.

तर संभाजीनगरात संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांची थेट लढत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्याशी आहे. एमआयएम, वचिंत आघाडीचे उमेदवारही रिंगणात असल्याने संभाजीनगरच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील(Imtiaz Jalil) यांचे मोठे आव्हान खैरे- भुमरे यांना असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संभाजीनगरात भुमरे यांनी जोर लावलेला असतानाच आपल्या पैठण मतदारसंघात रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या प्रचारासाठी आयोजित महायुतीच्या बैठकीला भुमरे आवर्जून उपस्थित होते. रावसाहेब दानवे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन यावेळी भुमरे यांनी केले. याप्रसंगी महायुतीचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT