Ashok Chavan and Nana Patole Sarkarnama
मराठवाडा

Nanded Loksabha Constituency : 'नानाभाऊ, तेव्हा कुठे गेलं होतं आईच प्रेम?'; अशोक चव्हाणांनी जुनं सगळंच काढलं...

Loksabha Election 2024 : 'मी बेईमान नाही, प्रामाणिकपणे जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत काम केले. अगदी शेवटपर्यंत मी पक्षाचे काम करत होतो.'

Jagdish Pansare

Nanded Political News : अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून काँग्रेसमधील नेते सातत्याने त्यांच्यावर टीका करत आहेत. मुंबईच्या शिवाजीपार्कवर झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेच्या संयुक्त सभेत राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण माझ्या आईजवळ येऊन रडले होते, असा दावा केला होता.

तर नुकतेच नागपुरात टीका करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेसने आईसारखे प्रेम केले, पण ते आईला विसरून भाजपमध्ये गेले म्हणत सुनावले होते.(Nanded Loksabha Constituency)

नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गुरुवारी (ता.4) झालेल्या सभेत अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी नाना पटोलेंना प्रत्युत्तर देत जुनं सगळंच उकरून काढलं. 2009 मध्ये मी मुख्यमंत्री असताना नाना पटोले काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते, याची आठवण करुन देत तेव्हा कुठे गेलं होतं, तुमचं आईचं प्रेम असा टोला लगावला.

संजय निरुपम, बसवराज पाटील, अर्चना पाटील (Archana Patil) हे सगळे काँग्रेस सोडून का जात आहेत? याचा एकदा विचार करा, एकाधिकारशाही जास्त काळ चालत नाही, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी नाना पटोलेंना उत्तर दिले. मी बेईमान नाही, प्रामाणिकपणे जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत काम केले. अगदी शेवटपर्यंत मी पक्षाचे काम करत होतो. तेव्हा नाना पटोले यांनी मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही.

देशाच्या विकासासाठी, मराठवाडा, विदर्भ, नांदेड जिल्हा आणि संपुर्ण महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही कामाला लागलो आहोत. काल नांदेडमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली, त्यात विकासावर काही बोलायचे सोडून फक्त अशोक चव्हाणवर टीका करण्यात आली. माझ्यावर टीका करून जिल्ह्याचं भलं होणार आहे का? असा टोलाही अशोक चव्हाण यांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण (Vasantrao Chavan) यांना लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा)

लोकशाहीत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे.पण भाषणात फक्त अशोक चव्हाण हाच विषय होता. जिल्ह्याच्या विकासाचा काही अजेंडा आहे की नाही? नुसतं अशोक चव्हाणवर टीका करून जिल्ह्याचे भलं होणार नाही. तुम्हाला जिल्ह्यासाठी इथल्या जनतेसाठी तुम्ही काय करणार आहात हे सांगावे लागेल, असेही चव्हाण म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT