Vasantrao Chavan, Prataprao Chikhalikar sarkarnama
मराठवाडा

Nanded Loksabha 2024 : 'महायुती'चे चिखलीकर मैदानात; 'महाविकास'चे घोडे वंचितमुळे अडले...

Ashok chavan नांदेड जिल्हा हा काँग्रेससाठी हमखास विजय मिळवून देणारा म्हणून ओळखला जायचा. पण अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडून भाजपत प्रवेश केल्यानंतर येथे काँग्रेसला अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे.

Laxmikant Mule

Nanaded Loksabha News : लोकसभा निवडणुकीची घोषणा काही तासांवर आली असताना महाविकास आघाडीचे जागावाटपाचे गुऱ्हाळ आद्यप संपले नाही. भाजपने ज्या जागेवर वाद नाही अशा राज्यातील वीस जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यात नांदेडचा समावेश असून, भाजपने विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर दुसऱ्यांदा विश्वास दाखवला आहे. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर कोलमडलेल्या काँग्रेसला मात्र अजूनही उमेदवार निश्चित करता आलेला नाही.

भाजपने उमेदवार घोषित करून महाविकास आघाडीला मागे टाकले असून, आता त्यांना काँग्रेसच्या उमेदवाराची प्रतीक्षा आहे. नांदेड जिल्हा हा काँग्रेससाठी हमखास विजय मिळवून देणारा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. पण अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडून भाजपत प्रवेश केल्यानंतर नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाला आपल्या अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. भाजपने विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना उमेदवारी घोषित करत कुठलीही जोखीम पत्करली नाही.

त्यामुळे दुसऱ्यांदा मैदानात उतरलेल्या चिखलीकरांना गेल्या निवडणूकीचा अनुभव कामी येणार आहे. याशिवाय त्यांना अशोक चव्हाण यांचीही साथ मिळणार आहे. नांदेडच्या जागेसाठी काँग्रेस तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे. माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे नाव सध्या उमेदवारीसाठी सर्वात पुढे आहे. त्यांच्या नावाची शिफारस प्रदेश कार्यालयाने केली आहे. असे असले तरी अद्याप राज्यातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांची यादी घोषित झालेली नाही.

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अशोक चव्हाण व चिखलीकर यांचे वर्चस्व राहिले आहे. आता हे दोन्ही नेते एकाच पक्षात असल्याने काँग्रेसला तगडा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवावा लागणार आहे. महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांची वंचित बहूजन आघाडी आल्याची चर्चा आहे. परंतु त्यांचेही अद्याप जागावाटप अंतिम झालेले नाही. शिवाय आंबेडकर सातत्याने बदलत असलेली भूमिका पाहता ते महाविकास आघाडीसोबत जातीलच याची शाश्वती देता येत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे नांदेडला काँग्रेसची धाकधूक वाढली असून, एमआयएमनेही आपले पत्ते अद्याप उघड केले नाहीत. या दोन्ही पक्षांची भूमिका काँग्रेससाठी महत्त्वाची ठरणार आहे. या दोन्ही पक्षांनी उमेदवार उभे केले तर काँग्रेसच्या अडचणीत वाढ होणार आहे. भारतीय जनता पक्षाने मिशन 45 यशस्वी करण्यासाठी नांदेडच्या जागेवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच चिखलीकरांनी स्वत:ची निवडणूक यंत्रणाही कामाला लावली आहे. महायुतीकडून निवडणुकीची जय्यत तयारी झाली असताना महाविकास आघाडी मात्र आताच पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT