Manoj Jarange Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Protest Mumbai : मुंबईला जाणाऱ्या मराठा आंदोलकांना जरांगे पाटलांचे आवाहन; म्हणाले...

Maratha Aarakshan Mumbai Morcha : गडबड गोंधळ करणाऱ्याला पोलिसाच्या गाडीत टाकून द्या

Sunil Balasaheb Dhumal

Maratha Reservation Mumbai Protest : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी काही वेळातच आपल्या सहकाऱ्यांसह अंतरवाली सराटी ते मुंबई पदयात्रेस सुरूवात करणार आहेत. आरक्षणाबाबत सरकारने टाळाटाळ केल्याचा आरोप करत जरांगेंनी आतापासून उपोषणास सुरूवात करणार असल्याचे जाहीर केले. यात्रेत कुणीही गडबड गोंधळ करू नये, शिस्तीचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी मराठा आंदोलकांना केले.

सराकरला भरपूर वेळ दिला. ते म्हणतील तसे वागलो, पण हातात काय मिळाले,असा प्रश्न उपस्थित करत आता मागे हटणार नाही, अशा ठाम निर्धार जारांगेंनी व्यक्त केला. गोदाकाठच्या गावातील अनेक तरुणांसह राज्यभरातील मराठा समाज अंतरवाली सराटीत जमा झाला आहे. काही वेळातच ते मुंबईकडे कूच करणार आहेत. तत्पूर्वी जरांगे पाटलांनी आंदोलकांना जाहीरपणे शिस्तीच्या काही गोष्टी सांगितल्या.

जरांगे पाटील (Manoj Jarange) म्हणाले, जे आंदोलनात सहभागी होणार आहेत त्यांनी शिस्त पाळणे गरजेचे आहे. कुणीही कुणाला डिवचणार नाही, कुणाच्या वाहनांना धक्का लावणार नाही, व्यसन करू नका, गडबळ गोंधळ होईल अशी विधाने, कृती टाळवीत. पोलिसांना सहकार्य करावे. कुणी आगाऊपणा करून पदयात्रेत गडबड करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला पोलिसांच्या गाडीत टाकून द्या. कुठेही अनूचित प्रकार होणार नाही, यासाठी सर्वांनी दक्ष रहा. सर्वांनी स्वयंसेवक म्हणून काम करा. तसेच आपले सर्व साहित्य आपल्यासोबत ठेवा, असे म्हणत त्यांनी आंदोलन करतेवेळी शिस्त महत्वाची आहे, याची आठवण करून दिली.

सरकार मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) देण्यास टाळाटाळ करत असल्याची शंकाही जरांगेंनी उपस्थित केली. 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या म्हणता, तशी कागदपत्रे दाखवता, मग प्रमाणपत्र का दिले जात नाही? नोंदी सापडलेल्यांना ताटकळत ठेवले जात असेल तर त्यांच्या सग्यासोयऱ्यांचे काय होणार ? आता माझा जीव गेला तरी मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असे म्हणताना जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले.

दरम्यान, अंतरवाली सरटीतून निघणाऱ्या पदयात्रेपूर्वी प्रशासनानही अलर्ट झाल्याचे दिसून आले. अनूचित प्रकार टाळण्यासाठी आंदोलनस्थळी आणि परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या पदयात्रेत माजी मंत्री, आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) सहभागी होण्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, २० जानेवारी निघणारी पदयात्रा २६ जानेवारीला मुंबईत दाखल होणार आहे. या दरम्यान आंदोलकांचे सहा मुक्काम होणार असून सातव्या मुक्कामाला आंदोलक मुंबईत दाखल होतील. मुंबईत जाता जाता मराठा आंदोलकांची संख्या तीन कोटी होईल, असा विश्वासही जरांगे पाटलांनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT