Pratap Chikhlikar, Sanjay Shirsat  Sarkarnama
मराठवाडा

Pratap Patil Chikhlikar : संजय शिरसाट यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं, आमच्यात डोकवण्याचा अधिकार त्यांना नाही; चिखलीकरांनी सुनावले!

Maharashtra politics News : महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे जबाबदार मंत्री आहेत, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत चुकीच्या पद्धतीने विधानं करणे शोभत नाही, असेही चिखलीकर म्हणाले.

Jagdish Pansare

Shivsena-NCP : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा करत शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला होता. यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मंत्री हसन मुश्रीफ यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिरसाट यांची तक्रार केली. त्यानंतर आता आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिरसाट यांना सुनावले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात डोकावण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही तुमच्या पक्षाचं बघावं, अशा शब्दात फटकारले.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील सर्व आमदारांचा पाठिंबा हा उपमुखमंत्री सुनेत्रा पवार यांना देण्यात आला आहे. आमच्या पक्षाचे सगळे निर्णय त्या घेतात. त्यामुळे संजय शिरसाट यांनी अशा प्रकारची विधाने करून संभ्रम निर्माण करू नये. नेमके कोणते आमदार, पदाधिकारी त्यांच्या संपर्कात आहेत, ती नावे तरी त्यांनी जाहीर करावीत, असे आव्हानच चिखलीकर यांनी शिरसाट यांना दिले आहे.

महायुती म्हणून आम्ही राज्यात काम करतो. एखादा पक्ष फोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करायचा अशी आमची धारणा नाही. महायुतीतील कोणत्याच पक्षाची ती असू नये. संजय शिरसाट हे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आहेत. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे जबाबदार मंत्री आहेत, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत चुकीच्या पद्धतीने विधानं करणे शोभत नाही, असेही चिखलीकर म्हणाले.

नांदेडची जागा राष्ट्रवादीला हवी..

विधान परिषदेच्या 17 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. संख्याबळाच्या आधारावर भाजपने (BJP) या जागेवर दावा सांगितला आहे. पण ही जागा राष्ट्रवादीला सुटावी, अशी मागणी आम्ही पक्षाकडे केली आहे. यासंदर्भात विधान परिषदेच्या कोणत्या जागा कोणत्या पक्षाने लढवाव्यात? यावर तीनही पक्षाचे प्रमुख नेते बैठकीत निर्णय घेतला आहे. आतापर्यंत यासाठीच्या दोन बैठका झाल्या आहेत. नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल.

परंतु संख्याबळाच्या जोरावर नांदेडची जागा भाजप मागत असेल तर इतर मतदारसंघात आम्ही नंबर एकला असूत, तिथे एकमेकांना उमेदवार निवडून आणण्यासाठी मदत लागणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून जागा वाटप येत्या दोन दिवसात अंतिम होईल. प्रत्येक राजकीय पक्षांनी आपले प्रस्ताव बैठकीत दिले आहेत. आता नेते जे ठरवतील ते आम्हाला मान्य करावे लागेल, असेही चिखलीकर यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT