NCP Leader resignation: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी विधानपरिषदेची उमेदवारी नाकारली : ठाण्यातील बड्या नेत्याचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम

NCP Ajit Pawar faction News: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून संधी न मिळाल्याने नाराज असलेल्या ठाण्यातील बड्या नेत्यानी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाचा राजीनामा दिला आहे.
NCP Executive List | Sunetra Pawar Clarification
Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून संधी न मिळाल्याने नाराज असलेल्या माजी खासदार व पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. परांजपे यांनी दिलेला राजीनामा हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

माजी खासदार व पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस व पक्ष प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यासोबतच महाराष्ट्र प्रदेश समनव्यक पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पाठवून दिला आहे.

NCP Executive List | Sunetra Pawar Clarification
MLC Election NCP: विधान परिषद उमेदवारीवरुन नाराज मिटकरींना मंत्री भरणेंनी फटकारलं; म्हणाले,'सुनेत्रावहिनींनी भावूक होऊन नाही, तर मेरिट पाहून..'

मनात अनेक भावना दाटून आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षामधील माझा 14 वर्षाचा प्रवास, सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मिळालेले प्रेम आणि विश्वास कायम स्मरणात राहील. आज अत्यंत जड अंतःकरणाने हा प्रवास इथेच संपवून नव्या वाटेवर पाऊल टाकून नवीन प्रवासाची सुरुवात करीत आहे..!, असे आनंद परांजपे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

NCP Executive List | Sunetra Pawar Clarification
Ambadas Danve nomination: शिवसेनेच्या दोन नेत्यांनी मित्रपक्षांना ठेवलं गाफील, ठाकरेंनी मोक्याच्या क्षणी बदलला निर्णय,दानवेंच्या उमेदवारीपूर्वी'मातोश्री'वर मोठ्या घडामोडी

दरम्यान, येत्या काळात आनंद परांजपे (anand paranjpe) कोणत्या पक्षासॊबत जाणार असल्याचे स्पष्ट केलेले नाही. मात्र, त्यांची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबतची वाढती जवळीकता पाहता व ठाणे जिल्ह्यातील राजकारण पाहता शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे मात्र त्यांचा हा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

NCP Executive List | Sunetra Pawar Clarification
MLC election 2026 : राष्ट्रवादीचा विधान परिषदेचा सस्पेन्स आज संपणार! सुनेत्रा पवारांच्या दरबारी खलबतं! एका जागेसाठी 'ही' चार नावे आघाडीवर

विधानपरिषदेची आमदारकी न मिळाल्यामुळे आनंद परांजपे हे नाराज होते. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन येथे भेट घेतली होती. या भेटीनंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आले होते. ते शिंदेगटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. राष्ट्रवादीमधील दोन गट पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक म्हणून आनंद परांजपे यांची ओळख होती. मात्र राष्ट्रवादीमधून आव्हाडांना सोडचिट्टी देत त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता.

NCP Executive List | Sunetra Pawar Clarification
Satara Politic's : साताऱ्यात मोठा भाऊ व्हायला निघालेल्या भाजपला राष्ट्रवादीने बरोबरीत रोखले; दोन मंत्री, आमदारांची रसदही कुचकामी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com