NCP Politics : मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 22 आमदार शरद पवारांच्या संपर्कात? पटेल, तटकरे भेटीआधीच...

Sharad Pawar NCP Sunetra Pawar : सुनेत्रा पवार नेतृत्त्व करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 22 आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे पुढे आले आहे. या विषयी साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
Sunetra Pawar, Sharad Pawar
Sunetra Pawar, Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

NCP News : सुनेत्रा पवार नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 22 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे वृत्त 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. हे आमदार शरद पवारांना देखील भेटून गेले आहेत. त्यानंतर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे शरद पवारांना भेटले, असे वृत्तात म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये युती आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये जाऊ शकत नाहीत आणि त्यांच्या मतदारसंघात भाजपचे तगडे उमेदवार आहेत तिथील आमदार शरद पवारांना भेटल्याचे 'साम'च्या वृत्तात म्हटले आहे.

12 मे रोजी सुनील तटकरे हे अचनाक शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले. शरद पवारांशी भेट झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. पवारसाहेबांची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण वेळ मागितला होता. वेळ मिळाल्यानंतर आपण त्यांची भेट घेतल्याचे सांगितले होते. या भेटीचा राजकीय अर्थ न काढू नये, असे देखील त्यांनी म्हटले होते.

Sunetra Pawar, Sharad Pawar
NCP internal conflict : दोनवेळा पंख छाटले, गुपचूप शरद पवारांना भेटले, योग्य वेळी बोलण्याचं सूचक विधान : पटेल-तटकरे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत?

सुनील तटकरे यांच्या भेटीनंतर तीन ते चार दिवसांनी तटकरे यांच्या भेटीवेळी प्रफुल पटेल हे देखील उपस्थित असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. तटकरे हे पोहोचण्यापूर्वीच प्रफुल पटेल हे शरद पवारांसोबत होते, असे वृत्तामध्ये म्हटले होते. मात्र, या विषयी अधिकृत पुष्टी प्रफुल पटेल यांच्याकडून करण्यात आली नाही.

राष्ट्रवादीकडून निवडणुकीची तयारी सुरू

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी प्रशांत किशोर यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीकडून 2029 मधील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे.दरम्यान पार्थ पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की , प्रशांतजी हे मित्र असून भावासारखे आहेत.

अजितदादांच्या काळापासून त्यांची आमच्याशी ओळख आहे. ते काल शहरात आले होते, त्यामुळे त्यांचे आमच्या घरी जेवणासाठी स्वागत करण्याचा आणि काही अर्थपूर्ण संवाद साधण्याचा आनंद आम्हाला मिळाला.,ते आमच्या सोबत काम करत असल्याच्या काही अटकळांबद्दल मी वस्तुस्थिती स्पष्ट करू इच्छितो की माझ्या माहितीनुसार त्यांनी राजकीय सल्लागार पद सोडून काही वर्षे झाली आहेत. त्यात बदल होईल असे मला वाटत नाही. पण जिथे गरज असेल तिथे आम्ही एकमेकांसाठी नेहमीच उपलब्ध आहोत आणि राहू.

Sunetra Pawar, Sharad Pawar
NCP Dispute : महायुती सरकारमधील मंत्र्यांचा दावा : अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार; तुटलेली मनं एक होणार नाहीत...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com