NCP Dispute : महायुती सरकारमधील मंत्र्यांचा दावा : अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार; तुटलेली मनं एक होणार नाहीत...

Mahayuti Governement Minister Statement : प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त होत असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
praful patel-sunil tatkare-Sunetra Pawar-Jay Pawar-Parth Pawar
praful patel-sunil tatkare-Sunetra Pawar-Jay Pawar-Parth PawarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar, 17 May : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार घडामोडी घडत असल्याचे दिसून येत आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आल्याचे दिसून आले. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी ही तांत्रिक चूक असल्याचे सांगून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पटेल आणि तटकरेंनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचे पुढे आले आहे. या सर्व घडामोडींवर महायुतीमधील ज्येष्ठ नेत्याने राष्ट्रवादीत मोठी फूट पडण्याची शक्यता बोलून दाखवली आहे, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

शिवसेना नेते तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडण्याची चिन्हं दिसत आहेत. आता ही तुटलेली मनं एक होणार नाहीत. आता जो प्रसंग आलेला आहे, तो पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर जेव्हा उभा राहतो, त्यावेळी अशा सगळ्या गोष्ट्या आणि काही कारणं त्याला लावून अजितदादांच्या राष्ट्रवादीत उद्रेक होणार आहे.

राष्ट्रवादीची कमांडच त्यांच्या हातात

जय पवार यांचा उल्लेख राष्ट्रीय सचिव, खजिनदार असा उल्लेख मुंबईतील एका कार्यक्रमात करण्यात आला आहे, कारण, त्यांच्याकडं ही पदं देण्यात आलेली आहेत. राष्ट्रवादीची (NCP) कमांडच त्यांच्या हातात दिल्यामुळे या सर्व पदांचा उल्लेख तर होणारच आहे. तो अधिकृत असल्यामुळे त्याला आक्षेप घ्यायचं कोणतंही कारण नाही. पण ज्यांना पदं दिलेली नाहीत, त्यांचं काय. त्यांचं भवितव्य काय असणार, हे आपल्याला थोड्या दिवसांत कळणार आहे, असेही शिरसाट यांना नमूद केले.

praful patel-sunil tatkare-Sunetra Pawar-Jay Pawar-Parth Pawar
Raju Shetti Angry : राजू शेट्टी पोलिसांवरच भडकले : 40 मिनिटांचा हिशेब द्या, काय समजताय स्वतःला? काय करणार तुम्ही?

रोहित पवारांना कदाचित माहिती नसावं

एखाद्या पार्टी फंडातून ब्यूटी पार्लरसाठी खर्च होतो, हे मी पहिल्यादा ऐकलं आहे. अशा प्रकारचा फंड मला वाटत नाही की, इतर कोणत्या पक्षात असेल. रोहित पवार यांना कदाचित त्याची माहिती नसावी, असेही शिरसाट यांनी नमूद केले.

praful patel-sunil tatkare-Sunetra Pawar-Jay Pawar-Parth Pawar
Satara Politic's : 'कृष्णा’च्या विजयाची चावी माजी मुख्यमंत्री, तीन आमदार, एका माजी आमदाराच्या हाती!

दरम्यान, खासदार पार्थ पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत मिटणार की ज्येष्ठ नेते आपला सवता सुभा उभा करतात, हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com