Dyanaraj Choughule, Kailas Shinde  Sarkarnama
मराठवाडा

Kailas Shinde News : उमरगा विधानसभेसाठी चुरस?, दलित समाजाची 'व्होट बँक' ठरणार निर्णायक

Political News : अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या उमरगा, लोहारा विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून इच्छूकांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

अविनाश काळे

Dharashiv News : लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून आतापासूनच निवडणूक लढण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे उमरगा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक कोण-कोण लढणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या उमरगा, लोहारा विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे, मात्र महायुतीकडून विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले (Dnyanraj Chougule) यांच्याशिवाय दुसऱ्या इच्छुक उमेदवाराची चर्चा होत नसली तरी भाजपाचे (Bjp) जिल्हा उपाध्यक्ष, सर्वांना परिचित असलेले कैलास शिंदे ऐनवेळी निवडणुकीत उतरले तर महायुतीत ऐनवेळी गोंधळ होऊ शकतो. (Kailas Shinde News)

उमरगा विधानसभा मतदारसंघ 2009 पासुन अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला. पहिल्याच निवडणूकीत शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांनी विजय प्राप्त केला. 2014 मध्ये मात्र शिवसेना व भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यावेळी भाजपाचे कैलास शिंदे यांची लढत शिवसेनेचे चौगुले व कॉंग्रेसचे किसन कांबळे यांच्याशी लढत झाली. कॉंग्रेसला सर्वाधिक असलेले पारंपारिक एकगठ्ठा मते मिळू शकला नव्हता. शिंदे यांच्यामुळे काँग्रेसला अप्रत्यक्ष धोका झाला तर शिवसेनेला फायदा झाला होता.

या निवडणुकीत शिंदे यांना 31 हजार मतदान मिळाले होते. 2019 च्या निवडणूकीसाठी भाजपकडून शिंदे यांची प्रबळ दावेदार होते. मात्र, शिवसेना -भाजप युती झाल्याने त्यांची अडचण झाली. आता शिंदे 2024 ची विधानसभा निवडणूक लढवावी, अशी त्यांच्या समर्थकांचा आग्रह दिसतो आहे. महायुतीतुन त्यांना उमेदवारी कशी मिळू शकते, हा प्रश्न असला तरी ऐनवेळी होणाऱ्या राजकिय बदलात त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते.

कोण आहेत कैलास शिंदे

कैलास शिंदे हे भाजपमध्ये गेल्या 30 वर्षापासुन कार्यरत आहेत. पहिल्यांदा कवठा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला; तरीही त्यांनी सामाजिक व राजकिय क्षेत्रात सक्रिय राहुन काम करत राहिल्याने कदेर जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले. दलित समाजाबरोबरच त्यांचे इतर समाजाशी सलोख्याचे संबंध आहेत.

दरम्यान, शिंदे यांचे सुपुत्र दिग्विजय शिंदे धाराशिव जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती असताना तालुक्यातील दलित समाजात मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. दिग्विजय राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या पक्षात ते सक्रिय आहेत. त्यांच्याकडे सर्व जातीधर्मातील तरूण कार्यकर्ते आहेत.

त्यांनाही विधानसभा निवडणुकीची ईर्षा दिसते आहे. कैलास शिंदे यांनी भाजपच्या बैठकीत निवडणुकीसाठी आपली तयारी नसल्याचे सांगितले आहे. मात्र, बदलत्या परिस्थितीत ते निर्णय घेऊ शकतात. बाप-लेकाचे निवडणुकीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. परंतु, महायुतीतुन ते शक्य होईल, असे वाटत नाही.

ठाकरे गटाकडे इच्छूकांची गर्दी

लवकरच होऊ घातलेली उमरगा विधानसभा निवडणुक रंगतदार होण्याची शक्यता दिसते आहे. कॉंग्रेसने मागच्या तीन निवडणूकीत दलित समाजाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली परंतु यश मिळाले नाही. चौथ्यांदा उमेदवारीबाबत मोठा निर्णय होऊ शकतो. महायुतीतुन आमदार चौगुले यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून इच्छुकांची गर्दी वाढली आहे.

दलित समाजाची "व्होट बँक" ठरणार निर्णायक !

याठिकाणी माला जंगम समाजाला उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु आहेत. महायुती वीरशैव कक्कय्या समाजाला प्रतिनिधीत्व देत आली आहे आता महाविकास आघाडी "स्वामी"चा निर्णय करण्याच्या हालचाली सुरु केल्याने दलित समाजाने काय करावे ? असा सुर आवळला जात आहे. निवडणूकीच्या दृष्टीने गुप्त बैठकाही सुरु असल्याची चर्चा होत आहे. येणाऱ्या काळात दलित समाजाच्या निर्णायक 'व्होट बँके'चा सर्वच पक्षाला विचार करावा लागेल. असे सध्या वातावरण तयार केले जात आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT