Uddhav Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Jadhav News : ऑपरेशन टायगरची चर्चा, तरी ठाकरेंच्या खासदाराच्या भेटीगाठी सुरूच; रेल्वे प्रश्नासाठी मंत्र्यांना साकडे!

political strategy News : परभणी- जालना व मराठवाडा भागातील रेल्वे विकासासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : शिवसेनेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोन खासदारांनी हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा जोर धरू लागली आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेतली. अर्थात मतदारसंघातील रेल्वे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी मंत्र्यांना निवेदन देऊन साकडे घातले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे खासदार संजय जाधव हे तीन टर्म खासदार आहेत. कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे. पक्ष फुटीनंतर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांचे काही गोष्टीवरून त्यांच्याशी मतभेदही होते. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, तर त्यांनी आदित्य ठाकरेंना मंत्री करायला नको होते, अशी सडेतोड भूमिका त्यांनी घेतली होती.

काही विषयावरून मतभेद असले तरी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ दिली नाही. परंतु आता दोन वर्षांनी राज्यात पुन्हा एका ऑपरेशनची चर्चा सुरू असताना दोन दिवसात दिल्लीतील दोन महत्वाच्या मंत्र्यांची संजय जाधव (Sanjay jadhav) यांनी भेट घेतली. या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी या दोन मंत्र्यांच्या भेटी या मतदारंसघातील कामे मार्गी लावण्यासाठी तसेच आदिवासी समाजाला न्याय मिळावा, यासाठी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

परभणी- जालना व मराठवाडा भागातील रेल्वे विकासासाठी आपम केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. विविध मागण्यांचे निवेदन देत हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जाधव यांनी त्यांना गळ घातली. माझ्या लोकसभा क्षेत्रातील तसेच मराठवाड्यातील सर्व दैनंदिन रेल्वे प्रवासी, विद्यार्थी, श्रमिक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दीर्घकाळाच्या समस्या लक्षात घेऊन रेल्वे सुविधा, सुरक्षित प्रवास, अतिरिक्त कोच, नवीन ट्रेन, स्टेशन थांबा, टर्मिनल व्यवस्था आणि रेल्वे विकास यासंबंधी 13 महत्त्वाच्या मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे केल्या.

कोल्हापूर-धनबाद एक्सप्रेसला गंगाखेड स्टेशनवर थांबा, पुणे-अमरावती आणि कोल्हापूर-धनबाद एक्सप्रेसमध्ये कमीतकमी एक अतिरिक्त आरक्षित कोच जोडणे, नांदेड-पुणे एक्सप्रेस आणि नंदीग्राम एक्सप्रेसला मानवत रोड स्टेशनवर दोन्ही दिशेने थांबा देण्यात यावा, नांदेड-पुणे एक्सप्रेसचा टर्मिनल पुणे जंक्शनवर पूर्ववत करण्यात यावा (सध्या हडपसर आहे, याठिकाणी सकाळी 4 वाजता सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसते), निजामाबाद-पंढरपूर पॅसेंजरमध्ये स्लीपर व थर्ड एसी कोच जोडणे आणि टीसी, आरपीएफ/जीआरपी, सफाई कर्मचाऱ्यांची पुरेशी तैनाती करणे या मुद्याकडे संजय जाधव यांनी रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले.

परभणी जंक्शनवर अतिरिक्त आरपीएफ/जीआरपी सुरक्षा आणि कमीतकमी दोन नवीन प्लॅटफॉर्म बांधणे, धर्माबाद-मनमाड पैसेंजरला कोडी (जि. जालना) स्टेशनवर थांबा देणे, परतूर स्टेशनवर नगरसोल-नरसापूर, नरसापूर-नगरसोल, हजूर साहेब नांदेड-अमृतसर सच्चखंड एक्सप्रेस या महत्त्वाच्या ट्रेनना थांबे देण्यात यावे. तसेच नांदेड-जोधपूर/जैसलमेर साठी जालना-मनमाड- जळगाव-अहमदाबाद मार्गाने नवी ट्रेन सुरू करणे, पूर्णा-पटना, नांदेड-रायचूर, बेंगलुरु-नांदेड एक्सप्रेसचा जालनापर्यंत विस्तार करावा, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मिरज-परळी पॅसेंजरचा पूर्णा जंक्शनपर्यंत विस्तार करावा, नांदेड-गंगानगर एक्सप्रेसची वारंवारिता साप्ताहिक ते त्रि-साप्ताहिक करणे, नागपूर-कोल्हापूर आणि अमरावती-पुणे एक्सप्रेसची गती वाढवून दैनिक करणे, परभणी जंक्शनवर नवी पिटलाइन, पूर्णा जंक्शनवर पिटलाइन विस्तार व ई-लोको शेड, परभणी-छत्रपती संभाजीनगर मार्गाचे दुहेरीकरण, परभणी-परळी वैजनाथ नवी रेल्वे लाइन लवकर सुरू करणे, रायलसीमा एसएफ एक्सप्रेस निजामाबाद ते तिरुपतीला परभणीपर्यंत विस्तारित, करणे अशी मागणीही या भेटीत रेल्वे मंत्र्याकडे करण्यात आली.

प्रवाशांची संख्या लक्षात घेत उन्हाळ्यात (एप्रिल-जून) विशेष ट्रेन सुरू कराव्या, नांदेड-परभणी-मडगाव, मुंबई, नाशिक, हिंगोली-परभणी-मुंबई, नाशिक, जालना-रत्नागिरी, मडगाव, अहमदाबाद, कोल्हापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर-सूरत, जोधपूर, मडगाव, नागपूर यांसारख्या मार्गांवर समर स्पेशल ट्रेन चालवणे या सर्व मागण्या प्रवाशी सुविधा तसेच प्रामुख्याने मराठवाड्याच्या सामाजिक-आर्थिक विकास या उद्देशाने करण्यात आल्या आहेत. रेल्वेमंत्री या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वासही जाधव यांनी भेटीनंतर व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT