dhanajay munde, sachin Muluk  Sarkarnama
मराठवाडा

Aimim-Shisvena News : धनुभाऊ, एमआयएमला हाकलून द्या; नाहीतर आम्हाला बाहेर पडू द्या; परळीत शिवसेना आक्रमक!

Parli municipal election News : भाजप-एमआयएम या पक्षांचाही या आघाडीत समावेश असल्याने याची राज्यभर चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही पक्षांनी या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

Jagdish Pansare

Parli News : परळी नगरपालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली. मात्र, गटनेता निवडीच्या प्रक्रियेत शिवसेनेला विश्वासात न घेता एमआयएमच्या नगरसेवकाला गटात घेतल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत संतापाचे वातावरण आहे. एकतर एमआयएमला गटातून हाकलून द्या, अथवा आम्हाला या गटातून बाहेर पडण्याची परवानगी द्यावी, अशी भूमिका शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी मांडली.

परळीतील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप (BJP), शिवसेना अन् एमआयएमने एकत्रित आघाडी केल्याने याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. याआधी अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये विकास मंचच्या नावाखाली सगळे पत्र एकत्र आले होते. भाजप-एमआयएम या पक्षांचाही या आघाडीत समावेश असल्याने याची राज्यभर चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही पक्षांनी या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर आता परळीत एमआयएमच्या एका नगरसेवकाला राष्ट्रवादीने सोबत घेतले. विशेष म्हणजे या आघाडीत शिवसेनाही (Shivsena) होती. पण आम्हाला विश्वासात न घेता राष्ट्रवादीने एमआयएमला सोबत घेतल्याचा आरोप या पक्षाच्या जिल्हाप्रमुखाने केला. निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 16, भाजपचे सात तर शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तसेच अपक्ष व एमआयएमचा गट स्थापन करुन त्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंद करण्यात आली.

यामुळे राजकीय काहुर माजले आहे. यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुळूक हे आता संतापले आहेत. गटनेता निवडीसाठी नगरसेवकांच्या नावांसमोर पक्षाचा उल्लेख नसल्याने एमआयएम गटात असल्याचे शिवसेनेला माहित नव्हते. मित्रपक्ष राष्ट्रवादीने एमआयएमला गटातून वगळावे, अन्यथा शिवसेनेला गटातून बाहेर पडण्याची परवानगी द्यावी, आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेवरुन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन नगरसेवकांच्या सह्यांनी शपथपत्र सादर करत अधिकृत भूमिका मांडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अंबादास दानवेंनी डोंक तपासून घ्यावे..

परळीत एमआयएमसोबत शिंदेची शिवसेना गेली यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी नवी युती मुबारक हो म्हणत डिवचले होते. मुळीक यांनी यावरून अंबादास दानवे यांना सुनावले. परळी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी मोठा पक्ष ठरला. यामुळे गटनेता राष्ट्रवादीचा होणार ही साधी बाब विरोधी पक्षनेते राहिलेल्या अंबादास दानवे यांना कळत नसेल तर त्यांनी स्वत:चे डोके तपासून घ्यावे, असा टोलाही मुळूक यांनी लगावला.

परळीत त्यांचा पक्ष औषधालाही राहिला नाही. त्यांच्या पक्षाने संभाजीनगरमध्ये रशिद मामू सारख्या दंगलखोर उमेदवारला उमेदवारी दिल्याचा आरोप करत त्याचा प्रचार करताना अंबादास दानवेंना काही वाटत नाही का? असा सवालही केला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT