Vikas Jadhav Latur Crime News Sarkarnama
मराठवाडा

Latur Shivsena News : अत्याचार प्रकरणात शिक्षा झालेल्या शिवसेना उपजिल्हाप्रमुखाला हटवणार!

A Shiv Sena deputy district chief has been punished and will be removed for the abuse of a minor girl : पाच वर्षापुर्वी त्याने शिवसेनेत प्रवेश केला होता. पक्षात फूट पडल्यानंतर जाधव याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे त्याआधीच जाधव याच्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार व तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल होता.

Jagdish Pansare

Crime News : शिवसेना शिंदे गटाचा लातूर येथील उपजिल्हाप्रमुख विकास जाधव याला अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी उदगीर न्यायालयाने दहा वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. यानंतर आता त्याची पक्षातून हकालपट्टी केली जाणार असल्याची माहिती आहे. या संदर्भात स्थानिक जिल्हाप्रमुखाकडून वरिष्ठांकडे या संपूर्ण प्रकरणाची माहिती पाठवली जाणार आहे.

पाच वर्षापुर्वी त्याने शिवसेनेत प्रवेश केला होता. पक्षात फूट पडल्यानंतर जाधव याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. विशेष म्हणजे त्याआधीच जाधव याच्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार व तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल होता. आता तीन वर्षापुर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी विकास जाधव याला उदगीर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

शिवसेनेत दाखल होण्यापुर्वी विकास जाधव हा छावा आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होता, अशी माहिती समोर आली आहे. (Latur) शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षाच्या वतीने जाधव याची जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड करण्यात आली होती. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्यात वाल्मीक कराड याचे नाव समोर आल्यानंतर लातूरमधील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांची महत्त्वाची बैठक झाली होती.

या बैठकी सध्या पदावर असलेल्या आणि नव्याने पक्षात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाची माहिती, त्याचे चारित्र्य तपासले जावे, त्यानंतरच पक्ष प्रवेश दिला जावा, असे ठरले होते. वरिष्ठ नेत्यांनीही पक्षात प्रवेश देताना योग्य आणि कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुणालाही पक्षात प्रवेश देऊ नका, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. विकास जाधव प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याने त्याला तात्काळ पदावरून हटवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

असे आहे प्रकरण

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील रहिवासी आणि शिंदेंच्या शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख असलेल्या विकास जाधव याने 2020 साली एका अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवले होते. या प्रकरणी घरच्यांनी समजून सांगितल्यानंतरही त्याने आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करत पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना सतत धमकावलं.

शिवाय त्याने एक वर्षभर त्या मुलीशी संबंध ठेवले. त्यानंतर बदनामी आणि बेइज्जत होऊ नये म्हणून मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार केली नाही. मात्र याचाच गैरफायदा विकास जाधवने घेतला. अखेर त्याच्या अत्याचाराला कंटाळून पीडित मुलीने आत्महत्या केली. आत्महत्येनंतर वाढवणा पोलिस स्टेशनमध्ये 3 सप्टेंबर 2020 रोजी पोस्को अंतग्रत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT