Nilanga News : लातूर येथील विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान अथवा हेलिकाॕप्टर उतरणे व उड्डाण घेण्याच्या अत्याधुनिक सुविधा नसल्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी अचानकपणे लातूर येथे मुक्कामी थांबले असून ते आजच बिदर (कर्नाटक ) अथवा हैद्राबाद येथून ते दिल्लीला जाणार होते. मात्र, माजी मंत्री अमित देशमुख यांनी मुक्कामाचा आग्रह केल्याने ते आजची रात्र लातूर येथे मुक्कामी राहणार आहेत.
शिवाय लातूर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यातील उमेदवार, आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा यानिमित्ताने आढावा घेणार आहेत. अचानकपणे लातूर येथे मुक्कामी थांबल्याने मराठवाड्यातील पदाधिकारी त्यांच्या भेटीसाठी लातूर गाठत आहेत.
लोकसभा निवडणुकीचा मराठवाड्यातील प्रचार सध्या जोरात सुरू असून संभाजीनगर, सोलापूर येथे विमान अथवा हेलिकाॕप्टर नाईट लॅण्डिंगची सुविधा आहे. सोलापूर येथील विमानतळावर दुरूस्तीचे कामे सुरू असल्याने अनेक दिग्गज नेते लातूरला येत आहेत.
यापूर्वी देवेंद्र फडणवीस सोलापूर येथे सभेला जाण्यासाठी लातूरला आले होते त्याच पध्दतीने सोलापूर येथील सभेसाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) हे लातूरला आले होते त्यानंतर ते सोलापूर येथील सभा आटोपून परत लातूर येथे परतले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लातूर येथून दिल्लीला जाणार होते. मात्र, रात्रीचे विमान उतरणे व उड्डाण करणे अशी सुविधा येथेनाही ही माहिती पायलटने दिल्यानंतर ते बिदर किंवा हैद्राबाद येथील विमानतळाकडे जाणार होते. मात्र, माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) व आमदार धीरज देशमुख यांनी आग्रह केल्याने ते हाॕटेल ग्रँड येथे मुक्कामी थांबले असून अचानकपणे त्यांचा मुक्काम ठरल्याने सुरक्षा व्यवस्थेची अचानक धावपळ उडाली.
ते हाॕटेल ग्रँड येथे मुक्कामी थांबले असून अचानकपणे त्यांचा मुक्काम ठरल्याने सुरक्षा व्यवस्थेची अचानक धावपळ उडाली. शिवाय जिल्हाभरातील काँग्रेस (Congress) कार्यकर्तेही लातूरच्या दिशेने त्यांच्या भेटीसाठी रवाना झाले. शिवाय यानिमित्ताने लातूर, धाराशिव व नांदेड येथील उमेवार व आमदार, महत्वपूर्ण पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. उद्या सकाळी नियोजित त्यांचे काय कार्यक्रम आहेत हे काँग्रेसकडून स्पष्ट केले जाणार आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.