Dharashiv News : निवडणूक विभागात उल्लेखनीय आणि नावीन्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल, तसेच विशेष जिल्हाधिकारी म्हणून धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांना छत्रपती संभाजीनगर विभागात अव्वल क्रमांक मिळवलेला आहे.
तसेच उत्कृष्ट उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुरस्कार धाराशिव उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी शिरीष यादव, तर उत्कृष्ट मतदान नोंदणी अधिकारी पुरस्कार धाराशिव येथील तहसीलदार निवडणूक विभाग संजय पाटील यांनी मिळविला आहे. जिल्ह्याने निवडणूक विभागाचे चार पुरस्कार मिळवले आहेत. तसेच उत्कृष्ट संस्थात्मक लोकशाही मित्र 2024 पुरस्काराने नळदुर्ग येथील परिवर्तन संस्थेचे मारुती बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय मतदारदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सहराज्य निवडणूक आयोगाचे सह मुख्य निवडणूक अधिकारी तथा उपसचिव मनोहर पारकर यांनी निवडणूक आयोगाच्यावतीने उत्कृष्ट कार्याबद्दल दिल्या जाणाऱ्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी, कर्मचारी, संस्था व संघटनांच्या पुरस्कारांची नुकतीच घोषणा केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यातील 6 विभागांतील 6 जिल्हाधिकारी व 6 उपजिल्हाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. विशेष जिल्हाधिकारी पुरस्कार हा डॉ. सचिन ओम्बासे यांना भटक्या व विमुक्त समाजातील व्यक्तीसाठी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल देण्यात आला आहे. त्यांनी भटक्या व विमुक्त जातीमधील नागरिकांची 75 शिबिरे घेतली होती. या शिबिरात आधारकार्ड, रेशनकार्ड, जन्मदाखला अशा विविध प्रकारचे दाखले देण्यात आले.
संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना या योजनेच्या माध्यमातून त्यांना अनुदान ही सुरू करण्यात आले. पारधी समाजातील नागरिकांसाठी ही शिबिर घेऊन डॉ. सचिन ओम्बासे यांनी त्यांना जात प्रमाणपत्रे दिली. 3 हजार 500 नागरिकांना जात प्रमाणपत्रे मिळाली, याचा त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत झाली.
तसेच 18 - 19 वयोगटातील नवमतदारांचे नोंदणी करण्याचे प्रमाण हे फक्त 0.7 % होते. त्यांनी विविध उपक्रम व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून हे प्रमाण 2.5 % वाढविले. त्यामुळे 40 ते 45 हजार नवमतदारांनी नोंदणीसाठी अर्ज केले. जिल्ह्यात 25 हजार नवमतदार वाढले आहेत.
जिल्ह्यातील मतदारयादीमध्ये सर्व ही मतदारांच्या छायाचित्राने पूर्ण आहे. स्थलांतरित मतदारांना 3 वेळा नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून नाव वगळण्याची प्रक्रिया केली आहे. तसेच त्यांनी तृतीयपंथी यांचा ही मतदार यादीत समावेश व्हावा, म्हणून विशेष मोहीम राबविली. यात 15 नवीन तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे.
(Edited by Amol Sutar)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.