Harshvardhan Jadhav sarkarnama
मराठवाडा

Harshvardhan Jadhav News : 2 लाख 83 हजार मतं घेणारा 'जाधव फॅक्टर' चालेना, हर्षवर्धन संतापले...

Loksabha Election 2024 : 2019 च्या निवडणुकीत आपल्या टॅक्टर फॅक्टरने शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना पंक्चर करणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव सध्या अडचणीत आले आहेत.

Jagdish Pansare

Loksabha Election : मराठा आरक्षणासाठी मी आमदारकीचा राजीनामा दिला. रस्त्यावर आलो अन् लोक भुमरे, खैरे, इम्तियाज जलीलच्या मागे धावत आहे. काय तर म्हणे आमचे संबंध आहेत, नातीगोती आहेत. पण मराठा आरक्षणासाठी या लोकांनी काय केलं? याचा विचार कधी करणार आहात की नाही? असा संतप्त सवाल अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव Harshvardhan Jadhav यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सकल मराठा समाजाला केला आहे.

2019 च्या निवडणुकीत आपल्या टॅक्टर फॅक्टरने शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना पंक्चर करणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव सध्या अडचणीत आले आहेत. मराठा समाज, आरक्षणाचा प्रश्न, शेतकरी आणि सर्वसामान्यांची कामे करताना मी संपत्ती, पैसा याला कधी महत्त्व दिले नाही. त्यामुळे गेल्यावेळी आठ कोटींची असलेली माझी संपत्ती घटली ही गोष्ट खरी आहे.

राजकारणात नेत्यांची संपत्ती कधी घटत नसते तर ती वाढतच जात असते. पण माझी घटली ही वस्तुस्थिती आहे. माझ्याकडे आज निवडणूक Election लढवायला पैसे नाहीत. मी कर्ज काढतोय. केवळ समाजाचे, सर्वसामान्यांची कामे करता यावीत. मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत जाऊन सोडवता यावा, हा त्यामागचा उद्देश आहे. पण काही लोक सगळेच नाही पण निवडक मंडळी सकल मराठा समाजाच्या नावाने नातेसंबंध, व्यवसायाचे कारण पुढे करून महायुतीचे संदीपान भुमरे, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे Chandrakant Khaire आणि एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्या मागे पळत सुटले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

भुमरे, खैरे, इम्तियाज यांनी मराठा आरक्षणासाठी काय केले? मी आमदारकीचा राजीनामा दिला, रसत्यावर आलो. त्या तुलनेत या तिघांनी काय केले, हे त्यांना विचारणार की नाही? इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणावर एक-दोन भाषणं केली म्हणजे मोठ काम केलं का? मग मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मी आमदारकीचा दिलेला राजीनामा, मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेले आंदोलन याला काही किंमत आहे की नाही? असा उद्विग्न सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे.

मराठा आरक्षणासाठी ज्या नेत्यांनी काही केले नाही, त्यांना पाठिंबा देऊ नका, अशी स्पष्ट भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. असे असताना काही तरी कारण सांगून सकल मराठा समाजाच्या नावाने कोणी भुमरे-खैरे-इम्तियाज यांच्या मागे पळणार असले तर यातून समाजाचे भलं होणार आहे का? असा प्रश्न हर्षवर्धन जाधव यांनी उपस्थित केला. 2019 च्या निवडणुकीत अपक्ष लढलेल्या हर्षवर्धन जाधव यांना मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून समाजाचा प्रचंड पाठिंबा मिळाला होता.

ट्रॅक्टर या त्यांच्या त्यावेळच्या निवडणूक निशाणीने जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. जाधव यांच्यावर मतांचा अक्षरशः पाऊस पडला. 2 लाख 83 हजार मते मिळवत त्यांनी निवडणुकीचा निकाल फिरवला होता. पण पाच वर्षात जाधव यांचा हा करिश्मा संपल्याचे दिसून आले आहे. महायुतीने संदीपान भुमरे यांच्या रुपात मराठा उमेदवार दिल्याने जाधव यांचा पर्याय यावेळी स्वीकारला जाणार नाही, असे बोलले जाते. एकूणच जाधव यांचा फॅक्टर या निवडणुकीत काम करताना दिसत नाहीये.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT