Bihar Loksabha Election : सुपौलला तिरंगी लढत; नवीन चेहऱ्याला मिळणार का संधी...

Supaul Loksabha २००९ मध्ये सुपौल मतदारसंघ बनल्यानंतर येथील मतदारांनी प्रत्येक वेळी नव्या खासदारावर विश्वास व्यक्त केला आहे.
Chandrahas Chaupal, Dileshwar Kamat
Chandrahas Chaupal, Dileshwar Kamatsarkarnama

Supaul loksabha News : बिहारच्या सुपौल लोकसभा मतदारसंघात मागील तीन निवडणुकांमध्ये प्रत्येक वेळी नवा चेहरा निवडून आला आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा जिंकण्यासाठी मैदानात उतरलेल्या संयुक्त जनता दलाचे उमेदवार दिलेश्वर कामत पुन्हा संधी मिळणार की खासदार बदलाच्या परंपरेनुसार यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार चंद्रहास चौपाल यांना संधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. सुपौलमध्ये तिसऱ्या टप्प्यात उद्या (७ मे) निवडणूक होणार आहे.

सुपौल लोकसभा मतदारसंघ २००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आला. तत्पूर्वी १९५२ पासून २००८ पर्यंत हा सहरसा मतदारसंघ होता. कॉंग्रेसच्या आणि समाजवादी विचारसरणीच्या प्रभावाखालील सहरसामध्ये कॉंग्रेस, प्रजा समाजवादी पक्ष, जनता पक्ष, जनता दलाचे उमेदवार निवडून आले होते.

२००४ मध्ये इथे बाहुबली पप्पू यादव यांच्या पत्नी रंजित रंजन या कॉंग्रेसतर्फे खासदार झाल्या होत्या. त्यानंतर २००९ मध्ये सुपौल मतदारसंघ बनल्यानंतर येथील मतदारांनी प्रत्येक वेळी नव्या खासदारावर विश्वास व्यक्त केला आहे. २००९ संयुक्त जनता दलाचे विश्व मोहन कुमार खासदार झाले. तर २०१४ मध्ये पुन्हा कॉंग्रेसच्या रंजित रंजन यांना संधी मिळाली.

Chandrahas Chaupal, Dileshwar Kamat
Bihar Lok Sabha Election: बिहारमध्ये भाजप राम भरोसे तर उमेदवार मोदी भरोसे..!

मागील निवडणुकीत संयुक्त जनता दलाचे दिलेश्वर कामत निवडून आले होते. आता २०२४ मध्येही एनडीए आघाडीतर्फे दिलेश्वर कामत दुसऱ्यांदा विजयाचा झेंडा फडकावण्यासाठी मैदानात उतरले आहे. सुपौल लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ मधेपुरामधील आहे. या सहापैकी निर्माली, पिपला, सुपौल, त्रिवेणीगंज या चार मतदारसंघांमध्ये संयुक्त जनता दलाचे तर छातापूर आणि सिंघेश्वर (मधेपुरा) या मतदारसंघांमध्ये अनुक्रमे भाजप आणि राष्ट्रीय जनता दलाचे आमदार आहेत.

एनडीएच्या आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे संयुक्त जनता दलाच्या दिलेश्वर कामत यांना अनुकूल वातावरण असले तरी त्यांच्याविरुद्ध इंडिया आघाडीतर्फे राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार चंद्रहास चौपाल यांनी जोरदार आव्हान उभे केले आहे. मात्र, माजी सनदी अधिकारी बैद्यनाथ मेहता यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrahas Chaupal, Dileshwar Kamat
Bihar JDU News: बिहारमधील 'या' शक्तिशाली नेत्यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात...

या भागातील कुशवाहा मतदारांची संख्या लक्षात घेऊन माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे पदाधिकारी असलेल्या वैद्यनाथ मेहता यांनी शड्डू ठोकला असल्याने सुपौलची लढाई तिरंगी होण्याची चिन्हे आहेत.

Edited By : Umesh Bambare

Chandrahas Chaupal, Dileshwar Kamat
Bihar Political News : पलटी नितीश कुमारांची अन् भाजपकडून ‘खेला’; तीन आमदारांना फोडले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com