Chhatrapati Sambhajinagar Loksabha News : 'अब की बार चारशे पार'मध्ये भुमरेंचा नंबर लावण्यासाठी भाजपने कसली कंबर ..

Political News : संभाजीनगर मतदारसंघातून लोकसभा लढवण्यास इच्छुक असलेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्याकडे सांगली, शिर्डी या दोन मतदारसंघाची जबाबदारी असतांना त्यांनी संदीपान भुमरे यांच्या प्रचारात सहभाग घेतला आहे.

Bhagvat Karahad, Sandipan Bhumre
Bhagvat Karahad, Sandipan Bhumre Sarakarnama

Chhatrapati Sambhajinagar News : भाजपने छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेवर दावा केला होता, हा मतदारसंघ भाजपलाच सुटावा यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण महायुतीत कराव्या लागणाऱ्या तडजोडीत हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सुटला. संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवर तयारीला लागा, असे आदेश दिले.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान, देशात चारशे पार आणि राज्यात मिशन 45 चे उदिष्ट गाठण्यासाठी भाजपने (Bjp) कंबर कसली आहे. संभाजीनगर मतदारसंघातून लोकसभा लढवण्यास इच्छुक असलेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Bhagvat Karad) यांच्याकडे सांगली, शिर्डी या दोन मतदारसंघाची जबाबदारी असतांना त्यांनी संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या प्रचारात सहभाग घेतला आहे.(Chhatrapati Sambhajinagar Loksabha News)


Bhagvat Karahad, Sandipan Bhumre
Sandipan Bhumre : छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात संदीपान भुमरे देणार खैरे, इम्तियाज जलील यांना आव्हान!

या शिवाय गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, भाजपचे आमदार प्रशांत बंब व सर्व स्थानिक नेते, पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते शहर आणि जिल्ह्यात भुमरेंच्या प्रचारात सक्रीय झाले आहेत. सोमवारी गंगापूर विधानसभा मतदारसंघात विविध गावांना भेटी देत भुमरे, कराड, बंब यांनी मतदारांशी संवाद साधला.

चहाच्या टपरीवर 'चाय पे चर्चा' करत भुमरे यांनी लोकसभेवर जाण्याची संधी द्या, अशी साद मतदारांना घातली. यावेळी डाॅ. कराड, आमदार बंब हे मोदी सरकारच्या दहा वर्षातील विविध लोकोपयोगी योजनांची माहिती देत देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्याची मोदी गॅरंटी सांगत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भुमरे यांच्या प्रचाराला उशीरा सुरवात झाली असली तरी ग्रामीण भागात त्यांना चांगला पाठिंबा मिळतो आहे. भाजपने गेल्या अडीच-तीन वर्षात मतदारांशी साधलेला संपर्क, केलेली संघटनात्मक बांधणी यातून महायुतीचा प्रचार घरोघरी पोहचवण्यात महायुतीला यश येत आहे.

संदीपान भुमरे यांचा सामना महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे, एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्याशी होणार आहे. येत्या काही दिवसांत संदीपान भुमरे यांच्या प्रचारासाठी राज्य आणि देशपातळीवरील महायुतीच्या मोठ्या नेत्यांच्या सभा होणार आहेत. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.


Bhagvat Karahad, Sandipan Bhumre
Sandipan Bhumre News : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संदीपान भुमरेंचे शक्तिप्रदर्शन

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com