Sandip Kshirsagar Beed News Sarkarnama
मराठवाडा

Beed Assembly Constituency : एक विचार, एक दिलाने काम करू, संदीप क्षीरसागर यांनी दिला विश्वास

Maske Mitramandal active for Sandeep Kshirsagar in Beed : राजकारण आणि समाजकारणाची सांगड घालून दांडगा लोकसंपर्क निर्माण केला. एकदिलाने पुढाकार घेऊन बीड मतदार संघातून आमदार क्षीरसागरांना निवडून आणण्याची जबाबदारी आता त्यांनी स्वीकारावी.

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Election 2024 : जेथे प्रामाणिकतेने काम करून ही विश्वास ठेवत नाहीत, तेथे थांबणे चुकीचे आहे. भारतीय जनता पक्षाचे सहा वर्ष अगदी प्रामाणिकपणे काम करूनही उलट अविश्वास दाखवला. कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. राज्यातील घाणेरडे राजकारण संपुष्टात आले पाहिजे.

पक्षाचे निरीक्षक जीवन गोरे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार व उमेदवार संदीप क्षिरसागर, माजी आमदार सय्यद सलीम, दिलीप गोरे, वैजनाथ तांदळे, दत्तात्रय ठोंबरे, गणेश जवकर, सोमनाथ माने, शेख जमील, जावेद कुरेशी आदींची यावेळी उपस्थिती होती. (Sandip Kshirsagar) यावेळी जीवन गोरे म्हणाले, राजेंद्र मस्के कर्तुत्वान माणूस आहे.

याकरिता दूरदृष्टी व दूरगामी विचाराचे नेते शरद पवारांचे नेतृत्व बळकट करण्यासाठी बीडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांना साथ देत असल्याचे राजेंद्र मस्के यांनी जाहीर केले. (Beed News) मस्के यांनी मित्रमंडळाची बैठक घेत आपला निर्णय जाहीर केला.

त्यांनी घेतलेला स्वाभिमानी निर्णय अभिनंदनीय आहे. राजकारण आणि समाजकारणाची सांगड घालून दांडगा लोकसंपर्क निर्माण केला. एकदिलाने पुढाकार घेऊन बीड मतदार संघातून आमदार क्षीरसागरांना निवडून आणण्याची जबाबदारी आता त्यांनी स्वीकारावी. बजरंग सोनावणे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातील जनतेने मताधिक्य देऊन मला विजयी केले.

माझ्या विजयामुळे राष्ट्रीय राजकारणात शरद पवार साहेबांचे नेतृत्व मजबूत झाले. आता विधानसभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा पवारांना बळ देण्याची संधी जनतेला मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आमदार संदीप क्षीरसागर निवडणूक लढवत आहेत. शेतकरी मित्र राजेंद्र मस्के यांच्या निर्णयामुळे आमचे बळ वाढले. राजेंद्र मस्के आणि त्यांच्या सहकार्यांनी घेतलेल्या भूमिकेचे मन:पूर्वक स्वागत करतो.

राजेंद्र मस्के मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोणताही संभ्रम मनात न ठेवता काम करावे. प्रत्येकाच्या कामाची दखल घेऊ, कोणतीही अडचण असो,आपसात विचार विनिमय करून निर्णय घेत जाऊ. आपण सर्व एक विचार एक दिलाने काम करू,कोणावरही अन्याय होणार नाही, असा विश्वास संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT