Chandarkant Khaire, Devendra Fadanvis, Sanjay Raut sarkarnama
मराठवाडा

Sanjay Raut News : राऊतांची भविष्यवाणी... मराठवाड्यातील चारही जागा जिंकणार; भाजपचा होणार सफाया

Chandrakant Khaire महायुतीचे छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : भाजप मिशन 45 चा दावा करत असले तरी त्यांनाच आता याची खात्री राहिलेली नाही. मराठवाड्याचा विचार केला तर शिवसेना म्हणजे आम्ही चारही लोकसभेच्या जागा जिंकणार आहोत, तर भाजपचा सफाया होणार असून त्यांच्या जालना आणि लातूर या दोन्ही जागा धोक्यात आहेत. तिथे निश्चित बदल घडणार असल्याची भविष्यवाणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली.

महायुतीचे छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राऊत यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करतानाच मराठवाड्यात कोणाची सरशी होईल, याचे भाकीत केले.

शिवसेना ठाकरे गटाच्या छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली आणि धाराशिव या चारही जागा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा संजय राऊत यांनी केला. भाजपच्या चारपैकी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना आणि सुधाकर श्रृंगारे निवडणूक लढवत असलेल्या लातूर मतदारसंघामध्ये या वेळी निश्चित बदल घडेल, असे राऊत म्हणाले.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण Ashok Chavan यांच्या नांदेडमध्ये तसेच पंकजा मुंडे यांच्या बीडमध्ये त्यांना निवडणूक सोपी नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला. भाजप कितीही दावा करत असला तरी महाविकास आघाडी महाराष्ट्रात 35 जागा जिंकेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वंचित सोबत का बिनसले? या प्रश्नावर आम्ही प्रकाश आंबेडकरांना हात जोडले, संविधान रक्षणासाठी महाविकास आघाडीसोबत या म्हणून सहा जागा देऊ केल्या. पण त्यांचे अनेकांशी वाद आहेत, त्या आम्ही का पडावे? असा आमचा प्रश्न होता. वंचितसाठी अजूनही आमचे दरवाजे उघडे आहेत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT