Sanjay Nikam, Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT News : कृष्णा पाटील डोणगावकर छुपा रुस्तम, पदासाठी त्यांनीच गद्दारी केली, अंबादास दानवेंची पाठराखण करत संजय निकम यांनी तोफ डागली!

Political News : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि आता सभापती पदाच्या बिनविरोध निवडीमुळे तोंडघशी पडलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अंतर्गत कलह वाढला आहे.

Jagdish Pansare

ZP Election News : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि आता सभापती पदाच्या बिनविरोध निवडीमुळे तोंडघशी पडलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अंतर्गत कलह वाढला आहे. अध्यक्ष पदाच्या निवडीवेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यावर आम्हाला डांबून ठेवले, आमचा परस्पर सौदा केला, 18 कोटी घेतल्याचा आरोप करणारे सदस्य संजय निकम आता त्यांचाच बचाव करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

सभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशानूसारच जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सर्व सदस्यांना तटस्थ राहण्यासाठी व्हिप जारी केला होता. यात कुठल्याही प्रकारची सौदेबाजी झालेली नाही. कृष्णा पाटील डोणगावकर यांची एकट्याची भूमिका सुरूवातीपासून वेगळी होती. त्यांना पद पाहिजे होते, म्हणून कालच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांनी गद्दारी केली.

भाजपला (BJP) मदत व्हावी म्हणून अंबादास दानवे यांनी मतदान न करण्याचा व्हिप काढत सौदेबाजी केल्याचा आरोप कृष्णा पाटील डोणगावकर यांनी केला होता. त्यावर शुक्रवारी संजय निकम यांनी प्रत्युत्तर देत त्यांचा आरोप खोडून काढला. शिवाय अंबादास दानवे यांनी माझ्यावर किंवा मी त्यांच्यावर केलेले आरोप हे चुकीचे आणि गैरसमजातून केले होते.

सगळे सदस्य एकत्र राहिले तर आपल्या उपाध्यक्ष पद आणि एखादे सभापती पद मिळू शकते, अशी आमची रणनीती ठरली होती. त्यानूसार आम्ही आठ सदस्य एकत्र होतो, तर कृष्णा पाटील डोणगावकर यांची वेगळी भूमिका होती. ठाणे, कर्जत इथे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमची बैठक झाली. तेव्हाही कृष्णा पाटील डोणगावकर एकटे वेगळ्या भूमिकेच्या विचारात होते, असा दावाही संजय निकम यांनी केला.

जिल्हा परिषदेच्या राजकारणात आतापर्यंत कृष्णा पाटील डोणगावकर यांनी घेतलेल्या भूमिका या पक्षविरोधीच होत्या हे लपून राहिलेले नाही. काल सगळ्यांना अंधारात ठेवून त्यांनी पक्षाचा व्हिप झुगारत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आमच्याकडे संख्याबळ नव्हते, शिंदेंच्या शिवसेनेकडे व इतर अपक्ष मिळूनही आमचा आकडा बहुमतापर्यंत पोहचत नव्हता. अशावेळी अंबादास दानवे यांनी तटस्थ राहण्याचा काढलेला व्हिप हा योग्य आणि उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरूनच काढला होता, असे निकम यांनी स्पष्ट केले.

अंबादास दानवे यांनी कुठल्याही प्रकारची सौदेबाजी केलेली नाही. किंवा भाजपला मतदान व्हावी म्हणून मतदान न करण्याचा व्हीप काढलेला नव्हता, याचा पुनरुच्चारही संजय निकम यांनी केला. निकम यांच्या या बदलत्या भूमिकेमुळे अनेकांना धक्का बसला आहे. जे कृष्णा पाटील डोणगावंकर संपूर्ण जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळाता दानवे यांच्यासोबत सावली सारखे वावरले, त्यांनीच त्यांच्यावर सौदेबाजीचे आरोप केले. आता पक्ष त्यांच्यावर काय कारवाई करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT