Shivsena UBT : म्हणे, एकमेकांवर केलेले आरोप गैरसमजातून; अंबादास दानवे-संजय निकम यांनी वादावर पडदा टाकला!

Ambadas Danve news : जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी गोव्यात सहलीवर गेलेल्या दोन सदस्यांवर त्यांनी भाजपकडून पैसे घेऊन गद्दारी केल्याचा आरोप केला.
Sanjay Nikam vs Ambadas Danve
Sanjay Nikam vs Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

ZP Election Politics News : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच वाद निर्माण झाले होते. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी गोव्यात सहलीवर गेलेल्या दोन सदस्यांवर त्यांनी भाजपकडून पैसे घेऊन गद्दारी केल्याचा आरोप केला. आरोप झालेले सदस्य संजय निकम यांनी मग दानवे यांच्यावर पलटवार करतांना त्यांनी अध्यक्षपदासाठी 18 कोटींचा व्यवहार केल्याचा आरोप केला.

आता या दोघांनी एकमेकांवर केलेले आरोप हे गैरसमजातून केले होते, आता आमच्यातील वाद मिटल्याचे सांगत या नाट्यावर पडदा टाकला. अंबादास दानवे (ambadas Danve) यांनी झेडपीतील विविध सभापतींच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नऊ सदस्यांची आपल्या संपर्क कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला अंबादास दानवे यांच्यावर डांबून ठेवले, आमचा सौदा केला, अध्यक्ष पदासाठी अठरा कोटी घेतले असा खळबळजनक आरोप करणारे संजय निकम हे ही हजर होते.

Sanjay Nikam vs Ambadas Danve
Shivsena UBT News : झेडपी अध्यक्षपदासाठी 18 कोटींचा व्यवहार; आरोप करणारे संजय निकम-अंबादास दानवे समोरासमोर, तगडा बंदोबस्त

या पार्श्वभूमीवर दानवेंच्या संपर्क कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अंबादास दानवे यांनीही बैठकीत प्रवेश करताच संजय निकम यांच्याकडे पाहून मला अठरा कोटी द्या, असा टोला लगावला. हे पैसे मिळाले तर माझी दलिंद्री दूर होईल. किमान दहा टक्के तरी द्या, असे म्हणत निकम यांना डिवचले. तर तुम्ही आरोप केले म्हणून मी बोललो, अशी सारवासारव निकम यांनी केली.

Sanjay Nikam vs Ambadas Danve
Maharashtra budget 2026 : CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंच्या आमदारावर पलटवार; म्हणाले, 'तुमच्या कर्जापेक्षा राज्यावरचे कर्ज कमी...'

बैठकीनंतर अंबादास दानवे-संजय निकम यांनी आमच्यात वाद नव्हताच, गैरसमजातून आम्ही एकमेकांवर आरोप केले होते, त्यात तथ्य नाही असे स्पष्ट केले. अंबादास दानवे यांनी आपण दोन सदस्य भाजपला मदत करणार, असा आरोप आपण केला होता, अशी कबुली दिली. पण आम्ही जो व्हिप काढला होता, की कोणत्याच पक्षाला मतदान करायचे नाही, तो सगळ्यांनी पाळला. त्यामुळे या आरोपाला काही अर्थ उरला नाही. पक्षातील सदस्यांना एकत्र ठेवण्याचा जिल्हा प्रमुख म्हणून माझा प्रयत्न होता आणि त्यात मी यशस्वी झालो असे त्यांनी सांगितले.

Sanjay Nikam vs Ambadas Danve
Maharashtra budget session: विधिमंडळातून निवृत्त झालेल्या उद्धव ठाकरेंची कामगिरी कशी? 'त्या' दोन भाषणांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी! हजेरी मात्र...

संजय निकम यांनी अंबादास दानवे यांनी माझ्यावर आरोप केल्यामुळे मी रागाच्या भरात त्यांच्यावर आरोप केले. पण ते चुकीचे आहेत, गैरसमजातून केले होते, असे सांगत भविष्यात आम्ही एकत्र पक्षासाठी काम करत राहणार, असे स्पष्ट केले. बैठकीत दोघे समोरासमोर येताच दानवेंच्या या वक्तव्याने वातावरण हलके झाले आणि वादावर पडदा पडल्याचे दिसले.

Sanjay Nikam vs Ambadas Danve
Shivsena UBT News : झेडपी अध्यक्षपदासाठी 18 कोटींचा व्यवहार; आरोप करणारे संजय निकम-अंबादास दानवे समोरासमोर, तगडा बंदोबस्त

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com