Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar sarkarnama
मराठवाडा

Parbhnai News : परभणीत शिवसेनेचे मिशन महापालिका, प्रभागनिहाय रोडमॅपची आखणी अन् बैठकांचा धडाका!

Municipal Corporation Election News : अजित पवाराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रोखणे हा या रणनितीचा भाग होता, अशीही चर्चा आहे. नगरपालिकेत ही पडद्यामागची युती किती यशस्वी होते? मतमोजणीनंतर कळेल, पण शिवसेनेने निकालाची वाट न पाहता महापालिकेचे मिशन हाती घेतले आहे.

सरकारनामा ब्युरो

Shivsena News : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत परभणी जिल्ह्यात महायुती झाली नसली तरी पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गुप्त समझोता झाल्याची चर्चा आहे. त्यानुसारच अनेक नगरपालिकांमध्ये भाजपने उमेदवार न देता शिवसेनेसोबत मैत्रीधर्म निभावल्याचे दिसून आले. अजित पवाराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रोखणे हा या रणनितीचा भाग होता, अशीही चर्चा आहे. नगरपालिकेत ही पडद्यामागची युती किती यशस्वी होते? मतमोजणीनंतर कळेल, पण शिवसेनेने निकालाची वाट न पाहता महापालिकेचे मिशन हाती घेतले आहे.

पक्षाचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी महापालिकेच्या दृष्टीने तयारीला लागा, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा बैठका घ्या, असे आदेश दिले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेची महत्वाची बैठक पक्षाच्या संपर्क कार्यालयात पार पडली. रणनीती अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या या बैठकीत निवडणूक तयारीचा सखोल आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, विभागप्रमुख, प्रभागप्रमुख आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेना (Shivsena) जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीत प्रभागनिहाय राजकीय परिस्थिती, स्थानिक प्रश्न, मतदारसंघातील प्रलंबित मागण्या आणि विरोधकांची रणनिती यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक प्रभागातील संघटनात्मक रचना मजबूत करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना, आगामी महिन्यात राबविण्यात येणाऱ्या जनसंपर्क मोहिमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली.

सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बूथ स्तरावर संघटन विस्तृत करण्याचे, नवमतदारांशी थेट संपर्क वाढवण्याचे, सामाजिक माध्यमांद्वारे पक्षाची विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक बूथ मजबूत-विजयानंतर थेट संपर्क या सूत्रावर भर देत राबविण्यात येणाऱ्या मोहिमांची माहिती जिल्हाप्रमुखांनी बैठकीत दिली. यावेळी शहरातील विविध प्रभागातील समस्या, नागरिकांच्या अपेक्षा आणि संभाव्य निवडणूक मुद्द्यांवर चर्चा झाली. प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र प्रभागनिहाय रोडमॅप तयार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

परभणी शहरातील विकासासाठी शिवसेनाच सक्षम पर्याय आहे. जनतेपर्यंत आपली कामे आणि दृष्टिकोन पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पुढाकार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मजबूत संघटन आणि प्रभावी रणनीती हीच आमची ताकद आहे, असे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT