Mahavikas Aghadi Sarkarnama
मराठवाडा

Nanded ShivsenaUBT: लोकसभेला आघाडी धर्म पाळत ठाकरे गट विधानसभेचे लक्ष्य गाठणार..

Loksabha Election 2024 : नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा(Congress) बालेकिल्ला असला तरी शिवसेनेनेही इथे चांगले बस्तान बसवले होते.

Laxmikant Mule

Nanded News : महाविकास आघाडीच्या जागावाटपात नांदेडची जागा काँग्रेसला सोडण्यात येणार असल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांना पहिल्यांदाच आघाडीचा धर्म पाळत काँग्रेसचा प्रचार करावा लागणार आहे. शिवसेना ठाकरे गटाला लोकसभेच्या निवडणुकीनंतर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने शिवसेनेच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बैठका घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला होता.

पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत घेतलेल्या महापत्रकार परिषदेत सभापती राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदारांच्या आपात्रतेविषयी घेतलेल्या निर्णयाची पोलखोल केली आहे. या निर्णया विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात व जनतेच्या न्यायालयात दाद मागण्याचे जाहीर केले आहे. याचा सकारात्मक परिणाम शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांत झाला असून एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा(Congress) बालेकिल्ला असला तरी शिवसेनेनेही इथे चांगले बस्तान बसवले होते. जिल्हात चारचार आमदार निवडून आणण्या इतपत शिवसेनेची ताकद होती. पण‌ हे चित्र गेल्या काही निवडणूकीत बदललेले आहे. गेल्या निवडणूकीत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदार बालाजी कल्याणकर हे निवडून आले होते, ते सध्या शिंदे गटात आहेत.

नांदेड लोकसभेची जागा युतीच्या जागावाटपात भारतीय जनता पक्षाला सुटायची. त्यामुळे एक अपवाद वगळता ही जागा भाजपनेच लढविली आहे. शिवसेने युतीचा धर्म पाळत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना हा एक घटक पक्ष आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार शिवसेना पहिल्यांदाच करणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेसाठी लोकसभा व विधानसभा निवडणुक महत्वाची आहे. जिल्ह्यात शिवसेनेला(Shivsena) गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) व काँग्रेसची मदत घ्यावी लागणार आहे. लोकसभेच्या निवडणूकीतील यशापयशावर येणाऱ्या काळातील विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. लोकसभेच्या निमित्ताने जिल्ह्यात ठाकरे गटाला नव्याने जमीन कसण्याची संधी मिळाली आहे.

लोकसभेनंतर अवघ्या 6 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. आता आघाडी धर्म पाळत येणाऱ्या विधानसभेचे लक्ष्य गाठण्यासाठी ठाकरे गटासाठी ही मोठी संधी समजली जात आहे. या निमित्ताने गेल्या काही वर्षापासून नांदेडकडे ठाकरेंसह मुंबईतील नेत्यांचे झालेले दुर्लक्षही दूर होईल.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT