Shubhangi Shinde  Sarkarnama
मराठवाडा

Shubhangi Shinde death case: शुभांगी शिंदे मृत्यूप्रकरणी ट्विस्ट; आत्महत्या नसून खूनच असल्याचा कुटुंबाचा आरोप; 'या' कारणामुळे वेगळाच संशय

Shubhangi Shinde suicide case News : शुभांगीच्या कुटुंबाने ही आत्महत्या नसून खून असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर तिच्या मृत्यूमागे 'या' कारणामुळे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

सरकारनामा ब्युरो

Beed News : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर तशाच स्वरूपाची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील गिता येथे घडली. सासरच्या छळाला कंटाळून शुभांगी संतोष शिंदे या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी संदीप कासगुंडे हा फरार आहे. फरार असलेला आरोपी भाजपचा बडा नेता आहे. मात्र, या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून शुभांगीच्या कुटुंबाने ही आत्महत्या नसून खून असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर तिच्या मृत्यूमागे 'या' कारणामुळे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

शुभांगीचा अंबाजोगाई तालुक्यातील गिता येथील संतोष विलास शिंदेसोबत 2022 मध्ये विवाह झाला होता. या लग्नात माहेरच्यांनी 3 लाख रुपये आणि 5 तोळे सोने हुंडा दिला होता. तरीही सासरच्या मंडळींकडून ऑप्टिकलचे दुकान टाकण्यासाठी माहेरवरून पैसे आणण्यासाठी छळ केला जात होता. व्यवसायासाठी माहेरच्यांनी 5 लाख रुपयेही दिले. पण आणखी पैसे देणे शक्य न झाल्याने शुभांगीला तिचा नवरा, सासू, सासरे आणि नणंद यांच्याकडून शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला होता. या त्रासाला कंटाळून शुभांगीने ५ जूनला आत्महत्या केली.

नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात

गुरुवारी सकाळी शुभांगीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या पतीने पत्नीचा भाऊ प्रदीप सोळंकेना फोन करून ही घटना कळवली होती. त्यावेळी प्रदीपने आम्ही येईपर्यंत मृतदेहाला हात लावू नका, अशी सूचना केली होती. त्यानंतरही शिंदे कुटुंबांनी तिचा मृतदेह खाली उतरावून तिच्या मृतदेहाला लसूण चोळल्याचा आरोप केला असून तिच्या मृतदेहावर व शेजारी ठेचलेला लसूण आढळून आला आहे. या प्रकारामागचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

या प्रकरणी शुभांगीचा भाऊ प्रदिप सोळंके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी पती संतोष शिंदे, सासरे विलास शिंदे, सासू सुमन शिंदे, नणंद सीमा शिंदे यांना अटक केली तर पतीचे मित्र असलेले संदीप काचगुंडे फरार आहेत. भाजपचे धारूर तालुका अध्यक्ष असलेल्या काचगुंडे याला अटक करण्यासाठी पथक रवाना केल्याची माहिती बर्दापूर पोलिसांनी (Police) दिली.

दरम्यान, शवविच्छेदन अहवालात गळफास घेऊन आत्महत्या झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, शुभांगीच्या कुटुंबाचा आक्षेप आहे की, ही आत्महत्या नसून हत्या आहे. शवविच्छेदन अहवालानुसार तपास सुरू असल्याची माहिती बर्दापूर ठाण्याचे प्रमुख राजकुमार ससाणे यांनी दिली.

फरार आरोपीला अटक करा

या प्रकरणातील फरार आरोपी संदीप काचगुंडे हा आरोपी संतोष शिंदेचा मित्र आहे. त्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्याशी चांगले संबंध आहेत. त्यांच्या माध्यमातून पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. या प्रकरणी काचगुंडेला त्वरित अटक करून मृतदेहाची अवहेलना का करण्यात आली, याची चौकशी करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे.

चुलत दीर करतोय लहान मुलाचा सांभाळ

मयत शुभांगी शिंदेला दीड वर्षाचा लहान मुलगा आहे. शुभांगीच्या आत्महत्येनंतर आरोपी पतीसह सासरा, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. तर दीड वर्षाचा लहान मुलाचा सांभाळ शुभांगीचा चुलत दीर करीत असल्याची माहिती सोळंके कुटुंबांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT