Suresh Dhas  sarkarnama
मराठवाडा

Suresh Dhas : सुरेश धसांकडून जिवाला धोका; संरक्षण काढल्याने सामाजिक कार्यकर्त्याची कोर्टात धाव; काय आहे नेमके कारण...

Political News : बीड जिल्ह्यातील वातावरण तापले असतानाच रविवारी सरंपच संतोष देशमुख हत्याप्रकरण लावून धरलेल्या आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Sachin Waghmare

Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 40 दिवस झाले आहेत. अद्याप या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणचा मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराड मोक्काचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातच आता या प्रकरणी दिवसांगणीस मोठे खुलासे होता आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण तापले असतानाच रविवारी सरंपच संतोष देशमुख हत्याप्रकरण लावून धरलेल्या आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

आमदार सुरेश धस यांनी गेल्या महिनाभरापासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण लावून धरले आहे. या प्रकरणामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. याप्रकरणी सुरेश धस यांनी मनोज जरंगे पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर यांना हाताशी धरत बीड, जालना, पुणे व धाराशिवमध्ये मोठे मोर्चे काढले आहेत. त्यामुळे याठिकाणचे वातावरण बदलून पोलीस प्रशासनाकडून वेगाने तपास केला जात आहे.

त्यातच आता बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी आमदार सुरेश धस यांचे एक प्रकरण बाहेर काढले आहे. त्यांनी धस यांच्या विरोधात कोर्टात याचिका देखील दाखल केली होती. त्यानंतर राम खाडे यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. दरम्यान खाडे यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक त्यांचे पोलीस संरक्षण काढण्यात आले असल्याचे सांगितले आहे.

'माझ्या जीवितास आमदार सुरेश धस, पत्नी प्राजक्ता धस, देविदास धस यांच्यासह अनेकांकडून धाेका आहे. त्यामुळे पोलीस संरक्षण पूर्ववत करण्यात यावे' अशी प्रतिक्रिया राम खाडे यांनी पोलीस संरक्षण काढून घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे म्हटले आहे.

आमदार सुरेश धस यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची कार्यवाही उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाई न केल्याने राजकीय हस्तक्षेप होत आहे. यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी व दहशत माजवण्यासाठी निर्घृण हत्येसारख्या घटना घडवल्या जात आहेत, असेही खाडे यांनी अर्जात म्हटले आहे.

देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात सुरेश धस हे मुख्य आरोपी आहेत. त्यांनी माध्यमांमध्ये स्वत:ला निर्दोष घोषित करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या २० वर्षांत धस यांनी कोणताही मोठा विकास प्रकल्प राबवलेला नाही, उलट शासकीय व इनाम जमिनींचा गैरवापर करून सार्वजनिक निधीची लूट केली आहे. या निवेदनात सामजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलीस संरक्षण पुन्हा देण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही त्यांच्या घरावर हल्ला झाला होता. त्यामुळे येत्या काळात पोलीस प्रशासनाकडून काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT