Sushma Andhare Sarkarnama
मराठवाडा

Sushma Andhare News : शिंदे - फडणवीसांवर टीकास्त्र, तर अजितदादांचे कौतुक; काय म्हणाल्या सुषमा अंधारे ?

Criticism in the Beed tour : जिल्ह्यातील शेतकरी आणि ऊसतोड कामगारांशी संवाद साधला.

Amol Sutar

Beed News : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचा बीड जिल्ह्यामध्ये दौरा सुरू आहे. यात त्यांनी बीड जिल्ह्यातील शेतकरी आणि ऊसतोड कामगारांशी संवाद साधला. दरम्यान, मुख्यमंत्री पदावरून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे, तर मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात सुरू असलेल्या गॅंगवॉरमध्ये अजित पवार पडणार नाहीत, असे म्हणत त्यांचे कौतुक केले आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा बीडमध्ये आली आहे. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली, तर मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात गॅंगवॉर सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे, तर भविष्यात अजित पवार मुख्यमंत्री होतील, असा सूर त्यांच्या कार्यकर्त्यांनी काढला आहे.

अशातच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक करत त्यांच्यामध्ये अजूनही संवेदनशीलता शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, आता मला नाही वाटत तशी काही वेळ येईल. कारण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील गँगवाॅर शिगेला पोहाेचला आहे. माणसं मेली तरी चालतील मात्र मुख्यमंत्री पद ताब्यात पाहिजे, अशी परिस्थिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशातच या सगळ्या गॅंगवॉरमध्ये मला नाही वाटत अजितदादा पडतील. कारण मला वाटतं ते अजूनही संवेदनशीलता शिल्लक आहे, अशी माझी धारणा आहे, अशा शब्दात अंधारे यांनी मुख्यमंत्री पदावरून शिंदे - फडणवीस यांना टार्गेट केले, तर अजितदादांचे कौतुक करून त्यांना टोलादेखील लगावला आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT