Tuljapur, 15 February : माजी आमदार राजन साळवी यांच्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणखी दोन बडे नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याचे पुढे आले आहे. येत्या मंगळवारी (ता. 18 फेब्रुवारी) हे दोन बडे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती खुद्द रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरेंना पुन्हा एका धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी लातूरहून परत येताना तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना गोगावले यांनी ठाकरेंना धक्का देणाऱ्या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, ‘ऑपरेशन टायगर’ची माझ्यावरही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. पक्षवाढीसाठी जी मंडळी आमच्याकडे येत आहेत, त्यांना आम्ही शिवसेनेत प्रवेश देत आहोत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक मोठमोठे नेते पक्षात येत आहेत.
येत्या मंगळवारी (ता. 18 फेब्रुवारी) ठाकरे गटाचे (Thackeray Group) दोन मोठे नेते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तसेच येत्या 16 फेब्रुवारी रोजीही काही लोक आमच्याकडे पक्षप्रवेश करणार आहेत. महायुती सरकार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोक आमच्याकडे येऊ पाहत आहेत. येत्या चार दिवसांत तालुकाप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांचाही शिवसेनेत प्रवेश होणार आहे, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.
धाराशिव जिल्ह्यातील ऑपरेशन टायगरची जबाबदारी ही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर देण्यात आलेली आहे, त्यामुळे ते जे काही करामती करायच्या ते करतील. पण, माझ्या संपर्कात ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत, त्यांचा पक्षप्रवेश येत्या 15 तारखेला होणार आहे, असेही गोगावले यांनी सांगितले.
पालकमंत्रिपदासाठी तुळजाभवानीला साकडं
आमचं मागणं काय आहे. आम्हाला काय पाहिजं काही नाही, ते तुळजाभवानी मातेलाही माहिती आहे. जनतेच्या मनात जे आहे, तेच मागणं आम्ही मागितलं आहे. रायगडचं पालकमंत्रिपद मिळावं, अशी आमची, आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदारबांधवांची इच्छा आहे, ती पूर्ण व्हावी, असं साकडं आम्ही तुळजाभवानी मातेला घातलं आहे, असे भरत गोगावले यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.