Vanraj Andekar Murder Case : बोपदेव घाटात प्लॅनिंग..तीनदा ट्रॅप फसला, पण चौथ्यावेळी आंदेकरांचा गेम झाला; 1700 पानांचे दोषारोपपत्र दाखल

Pune Crime News : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या खून प्रकरणामध्ये 21 आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अन्वये 1700 पानांचे दोषारोपपत्र विशेष मोक्का न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात दाखल केले आहे.
Vanraj Andekar
Vanraj AndekarSarkarnama
Published on
Updated on

Pune, 15 February : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून करण्यासाठी बोपदेव घाट आणि आंबेगाव पठार येथे आरोपींच्या बैठका होऊन प्लॅनिंग झाले होते. त्यानुसार आरोपींनी तीन ठिकाणी आंदेकर यांचा खून करण्यासाठी ट्रॅप लावला होता. तो ट्रॅप फसला, मात्र चौथ्यावेळी त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला, अशी माहिती या तपासून पुढे आली आहे.

पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेने या खून प्रकरणामध्ये 21 आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अन्वये 1700 पानांचे दोषारोपपत्र विशेष मोक्का न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात दाखल केले आहे. यात आंदेकर यांची बहीण संजीवनी, जावई जयंत, टोळीप्रमुख सोम्या गायकवाड, गणेश आणि प्रकाश कोमकर यांच्यासह २१ जणांविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तपास अधिकारी गणेश इंगळे आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी हे आरोपपत्र दाखल केले.

मालमत्ता व टोळ्यांच्या भांडणातून १ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठ येथील डोके तालीम परिसरात वनराज आंदेकर (Vanraj Andekar) याचा गोळ्या झाडून खून झाला होता. संजीवनी, जयंत, गणेश आणि प्रकाश कोमकर यांचे वनराज आंदेकर कुटुंबीयासोबत मालमत्तेवरून वाद होते.

आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर आणि इतरांनी २०२३ मध्ये सोमनाथ गायकवाडच्या टोळीतील एकाचा खून केला होता. त्या रागातून गायकवाडसह इतरांनी वनराजच्या खुनाचा कट रचला होता, असे तपासात उघड झाले होते. दापोली येथील पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही चित्रीकरण, ३९ साक्षीदारांचे जबाब आणि आरोपींचे फोनवरील संभाषण आदी पुरावे पोलिसांनी आरोपपत्रासोबत जोडले आहेत.

Vanraj Andekar
Raju Shetti : कृषिमंत्र्यांना इंगा दाखवल्याशिवाय आम्ही सोडणार नाही; राजू शेट्टींनी चाबूक उगारला

कोयत्याने मारणे शक्य होत नसल्याने 8 पिस्तूल आणली

सुरुवातीला वनराज आंदेकर यांचा मर्डर कोयत्याने करण्याचे ठरले होते. मात्र, कोयत्याने मर्डर करणे अधिक रिस्की असल्याने तुषार कदम, आकाश म्हस्के, सागर पवार,अनिकेत दुधभाते यांनी सर्व मिळून 1 लाख 60 हजार जमा केले होते. तर साहिल दळवी याने मोहोळमधून 8 कोयते विकत आणले होते. अभिषेक खोंड आणि संगम वाघमारे यांनी मध्य प्रदेशाच्या सीमेवरून 8 पिस्तूलं आणि 21 जिवंत काडतुसे विकत आणली होती.

Vanraj Andekar
Vijay Wadettiwar : 'मुख्यमंत्री महोदय, शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषिमंत्र्यांना मंत्रिमंडळातून हाकला'; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

नारायणपूरमधील माळरानावर फायरिंगचा सराव

खून करण्यापूर्वी समीर काळे आणि साथीदारांनी पुरंदर तालुक्यातील नारायणपूरजवळील माळरानावर फायरिंगचा सराव केला. या सरावासाठी मध्य प्रदेशातून आणलेली पिस्तूलं वापरण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com