Raju Shetti : कृषिमंत्र्यांना इंगा दाखवल्याशिवाय आम्ही सोडणार नाही; राजू शेट्टींनी चाबूक उगारला

Manikrao Kokate Controversial Statement : शेतकऱ्यांनी कधीही तुमच्याकडे एक रुपयात पीकविमा द्या, असं म्हटलेलं नव्हतं. उलट शेतकऱ्यांचं म्हणणं एवढंच होतं की, आम्ही पीकविम्याचं पैसे भरल्यानंतर इमानदारीनं आमचं नुकसान झालं असेल तर आमचं विम्याचं पैसं आम्हाला द्या.
Raju Shetti-Manikrao Kokate
Raju Shetti-Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 14 February : शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त विधान करणारे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठवली जात आहे. पीकविम्याची थेट भिकेशी तुलना केल्यामुळे राज्यात नवा वाद निर्माण झाला असून विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी तर शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या कृषिमंत्र्यांना इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही’ असा इशारा दिला आहे.

राजू शेट्टी (Raju shetti) म्हणाले, आजकाल भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, असं वक्तव्य करून एक रुपयात पीकविमा घेणाऱ्या शेतकऱ्यांची टिंगल करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. राज्यातील कुठल्याही शेतकऱ्याने तुमच्याकडे एक रुपयात पीकविमा मागितलेला नव्हता. पण ज्या पद्धतीने पीकविमा योजनेत बीड जिल्ह्यात घोटाळे झाले आहेत. गैरव्यवहार झाले आहेत.

शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा (Crop Insurance) द्यायचा आणि त्यात गैरव्यवहार करायचे. जे लाभधारक आहेत, त्यांच्याऐवजी भलत्याच्याच नावाने पैसे काढायचे, असे उद्योग भ्रष्ट मार्गाने करत असताना शेतकऱ्यांनाच बदनाम करायचे उद्योग थांबवा. शेतकऱ्यांनी कधीही तुमच्याकडे एक रुपयात पीकविमा द्या, असं म्हटलेलं नव्हतं. उलट शेतकऱ्यांचं म्हणणं एवढंच होतं की, आम्ही पीकविम्याचं पैसे भरल्यानंतर इमानदारीनं आमचं नुकसान झालं असेल तर आमचं विम्याचं पैसं आम्हाला द्या. एवढचं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं, असंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं.

Raju Shetti-Manikrao Kokate
Vijay Wadettiwar : 'मुख्यमंत्री महोदय, शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषिमंत्र्यांना मंत्रिमंडळातून हाकला'; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

शेतकऱ्यांची चेष्टा करणारे, अपमान करणारे वक्तव्य कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा केलं तर त्यांना आम्ही इंगा दाखवल्याशिवाय सोडणार नाही, एवढ्या त्यांनी ध्यानात ठेवावं, असं उघड चॅलेज माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोकाटे यांनी दिले आहे.

Raju Shetti-Manikrao Kokate
Jarange On Munde-Dhas Meeting : मुंडेसोबतच्या भेटीनंतर मनोज जरांगे धसांवर तुटून पडले; म्हणाले, ‘गद्दारांच्या यादीत बसलात, मराठ्यांसोबत दगाफटका, आतून षडयंत्र...’

काय म्हणाले होते माणिकराव कोकाटे?

नागपूर आणि अमरावती कृषी विभागाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना माणिकराव कोकाटे यांनी पीकविम्यासंदर्भात विधान केले आहे. राज्य सरकार एक रुपयात पीकविमा देते, त्याचा काहींनी गैरउपयोग केला आहे. हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एका रुपयात पीकविमा दिला, असे वक्तव्य कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com