Raosaheb Danve  Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve News : ठाकरे गटाचे आमदार अपात्र कधी होणार? रावसाहेब दानवेंनी दिले उत्तर...

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत प्रतिक्रिया देताना ठाकरे यांच्या प्रश्नाचे उत्तरच देऊन टाकले.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक लक्ष लागलेल्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर बुधवारी (ता. १० जानेवारी) विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. हा निकाल देताना शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले. परंतु दोन्ही बाजूंच्या आमदारांना पात्र ठरवल्यामुळे ठाकरे गटाने नार्वेकरांच्या निकालाला लोकशाहीचा खून, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (When will MLAs of Thackeray group be disqualified? Raosaheb Danve gave answer..)

शिवसेनेची घटना वैध नसेल तर आमचे आमदार अपात्र का केले नाही? असा सवाल या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी केला होता. दरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत प्रतिक्रिया देताना ठाकरे यांच्या प्रश्नाचे उत्तरच देऊन टाकले. उद्धव ठाकरे यांनी आमदार अपात्र का ठरवले नाही? असा सवाल केला आहे. परंतु विधानसभाध्यक्षांच्या कालचा निकालानंतर शिवसेनेचे भरत गोगावले हेच प्रतोद असल्याचे स्पष्ट झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे प्रतोद म्हणून भरत गोगावले जेव्हा एखादा व्हीप काढतील, तेव्हा तो ठाकरे गटाच्या आमदारांनाही लागू असेल. गोगावलेंचा व्हीप जर त्या आमदारांनी नाकारला तर मात्र त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.

नार्वेकर यांनी काल दिलेला निकाल हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि नियमानुसार दिलेला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणारच, परंतु तिथेही ठाकरे गटाला दिलासा मिळणार नाही, असा दावाही रावसाहेब दानवे यांनी केला.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील जनतेला कन्व्हेन्स करण्यात अपयशी ठरले आहेत, म्हणून ते कन्फ्यूज करीत आहेत. राजकारणात एक तर कन्व्हेन्स करावे लागते, नाही तर कन्फ्यूज, असेही दानवे म्हणाले.

शिवसेनेच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाबद्दल काय निकाल लागेल? असे विचारले असता हा प्रश्न मात्र रावसाहेब दानवे यांनी खुबीने टाळला. मी काही न्यायाधीश नाही, याचा निकाल काय लागेल हे मला सांगता येणार नाही, असे म्हणत दानवे यांनी प्रसारमाध्यमांचीच विकेट काढली.

Edited By : Vijay Dudhale

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT