Uddhav Thackeray Raj Thackeray  Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena Mns alliance : ‘मातोश्री’वरून मोठी अपडेट; ठाकरेंनी थेट नगरसेवकांच्याच हाती निर्णय सोपवला; मनसेसोबत युती चालणार का ?

Thackeray corporators decision News: शिवसेनेत उभी फूट पडल्याने भाजपने ही शिंदे गटाला सोबत घेऊन मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून शिवसेना ठाकरे गटाने बैठकांचे सत्र सुरूच आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे. मुंबई पालिकेवर गेल्या काही वर्षांपासून एकसंध शिवसेनेचे वर्चस्व होते. हे वर्चस्व टिकवण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेत उभी फूट पडल्याने भाजपने ही शिंदे गटाला सोबत घेऊन मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून शिवसेना ठाकरे गटाने बैठकांचे सत्र सुरूच आहे.

बुधवारी दुपारी ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची ‘मातोश्री’वर बैठक झाली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून मनसेसोबत युती करायची की नाही? याबाबत पक्षाच्या माजी नगरसेवकांना विचारणा करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज-उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

राज्यात येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना (Shivsena) ठाकरे गट युतीच्या चर्चेने जोर धरला आहे. गेल्या जवळपास तीन महिन्यापासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, आठ दिवसापूर्वीच राज ठाकरे-मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका हॉटेलमध्ये भेट झाल्याने ठाकरे बंधूंची युती होणार नसल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र आता पुन्हा ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला उधाण आले आहे.

बुधवारी ‘मातोश्री’वर पार पडलेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आगामी निवडणुकीसाठी मनसेसोबत युती करायची की नाही? याबाबत पक्षाच्या माजी नगरसेवकांना विचारणा केली असल्याची माहिती काही माजी नगरसेवकांनी दिली. त्यावेळी येत्या काळात युती केली तर फायदाच होईल अशी कबुली माजी नगरसेवकांनी दिल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे उत्सुकता ताणली गेली आहे.

आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी युतीला पोषक वातावरण आहे. त्यामुळे युती केल्यास फायदा होईल, असे काही माजी नगरसेवकांचे म्हणने आहे. त्यांनी बैठकीवेळी स्प्ष्टपणे सांगितले आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेसाठी आपल्याला ज्या पक्षासोबत येत्या काळात युती करायची आहे, त्यासंदर्भात तुम्हाला विश्वासात घेऊनच निर्णय होईल, असेही या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात राज-उद्धव ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चेला दुजोरा मिळाला आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये निवडणूक लागू शकते. लवकरच शिवसेना भवन येथे आपण निवडणूक कार्यालय उघडणार आहोत. तुम्ही सोबत राहिलात, तुम्ही निष्ठावंत आहात. येत्या काळात आपल्याला अनेक बैठका घ्यायच्या आहेत, असेही यावेळी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले.

येत्या काळात महानगर पालिकेवर भगवा फडकवायचा असा निर्धार आम्ही केला आहे. युती संदर्भात आम्हाला विचारणा केली, त्यावर आमचे मत मांडले आहे. सध्या वातावरण अनुकूल आहे. त्यामुळे सध्या मनसे-शिवसेना ठाकरे गटाचे एकत्रित आंदोलन होत आहे, कार्यकर्ते देखील काम करत आहेत, अशी प्रतिक्रिया या बैठकीनंतर काही माजी नगरसेवकानी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT