Uddhav-Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

BMC election: दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! मुंबई पालिकेच्या रिंगणात नातेवाइकांसाठी जोरदार लॉबिंग; कोणाचे नशीब फळफळणार?

BMC election nominations News : ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आता नेतेमंडळीने नातेवाईकांसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची धडधड वाढली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे चार दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांत उमेदवारीवरून रस्सीखेच सुरु आहे. महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युतीची घोषणा झाली नाही तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मनसेची युती जाहीर झाली आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आता नेतेमंडळीने नातेवाईकांसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची धडधड वाढली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी भाजप (Bjp), एकनाथ शिंदे यांची शिवसेना, मनसे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेस कडून केली जात आहे. याठिकाणी सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. अनेक आजी-माजी आमदार आणि खासदार आपल्या वारसांना महापालिकेत पाठवण्यासाठी इच्छुक आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात इच्छुक आहते. अनेक दिग्गज नेते आपल्या मुला-मुलींना, सून आणि इतर नातेवाईकांना उमेदवारी मिळावी यासाठी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे आता या नेतेमंडळीच्या नातलगांना उमेदवारी दिली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी मुलाला गोरेगावमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. तर शिवसनेचे (Shivsena) नेते अजय चौधरी यांनी सुनेला परळमधून उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी मुलीला वरळीतून निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.

त्यासोबतच माजी आमदार विनोद घोसाळकर हे दहिसरमधून धाकटी सून पूजा घोसाळकर यांना तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. भांडूपमधून खासदार संजय पाटील मुलीला तिकीट मिळावे यासाठी इच्छूक आहेत. माजी महापौर श्रद्धा जाधव आपल्या मुलासाठी वडाळ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी फिल्डिंग लावून आहेत.

मुंबई महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे. त्यापूर्वी सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करत आहेत. युती आणि आघाडीच्या राजकारणामुळे काही ठिकाणी जागावाटपाचा पेच असला, तरी नेत्यांनी आपापल्या नातलगांच्या जागा सुरक्षित करण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT