Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Nagar Political News : अजितदादांच्या 'पीएच.डी'वरुन 'मनविसे'ची स्पर्धा..

Ajit Pawar Statement on Phd student : 'काय दिवे लावणार', हे वाक्य घेत या 'दिव्यां'बाबत युवकांनी आपआपली उत्तरे नोंदविण्याचे आवाहन..

Pradeep Pendhare

Nagar Political News : राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'पीएच.डी करून विद्यार्थी काय दिवे लावणार?', असे केलेल्या वक्तव्याने राज्यातील शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात त्याचे पडसाद उमटले. या वक्तव्यावर टीका होऊ लागल्याने अजितदादांनी दिलगिरी व्यक्त करून बाजू सारवली. परंतु विरोधकांनी हा मुद्दा अजून लावून धरलाय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने याच वक्तव्यावर आता स्पर्धा आयोजित केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पीएचडीवर केलेल्या वक्तव्यावर स्पर्धा आयोजित केली आहे. त्यांनी विधानपरिषदेत 'पीएच.डी करून विद्यार्थी काय दिवे लावणार आहेत का?', असे वक्तव्य केले होते. महागाईमुळे उच्च शिक्षण सर्वसामान्यांना परवडत नाही. तरी देखील नोकरी मिळवण्यासाठी युवक उच्च शिक्षण घेत राहतो.

पीएचडी (PH.D)देखील उच्च शिक्षणाचा भाग आहे. यासाठी सरकारकडून फेलोशीप दिली जाते. ही फेलोशीप गुणवत्तेच्या आधारावर दिली जाते. यासाठी हजारो युवक सरकारकडे अर्ज करतात. परंतु अजित पवार यांनी या अर्जांचा वेगळाच अर्थ काढून केलेल्या वक्तव्यातून उच्च शिक्षण घेणाऱ्या युवकांच्या भावना दुखवल्या आहेत.

हाच धागा पकडत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने स्पर्धा आयोजित केली आहे. 'काय दिवे लावणार', हे वाक्य घेत या 'दिव्यां'बाबत युवकांनी आपआपली उत्तरे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या संपर्क कार्यालयात अथवा सोशल नेटवर्कवर मो. 9860521022 या क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चांगल्या पहिल्या दहा उत्तरांना बक्षीस देवून गौरवण्यात येणार आहे.

तसेच आलेल्या उत्तराचे संग्रह करून सरकारकडे पाठवले जाणार असून सारथी योजनेत फेलोशीपची संख्या वाढवण्यासाठी मनविसेकडून लढा उभारला जाणार आहे. मनविसेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा म्हणाले, "उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे दमदार नेते आहेत. युवकांकडून त्यांना अनेक अपेक्षा आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महागाईबरोबर बेरोजगारी वाढत असतानाच युवकांच्या उच्च शिक्षणाविषयी अशी वक्तव्य करून खिल्ली उडवणे रुचले नाही. उच्चशिक्षणाचे महत्त्व अजित पवार यांना कळावे यासाठी ही स्पर्धा आहे". त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत असून, मनविसे राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे खंबीरपणे उभी आहे, असेही सुमित वर्मा म्हणाले.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT