devendra fadnavis | narendra modi sarkarnama
महाराष्ट्र

Narendra Modi appeal: पीएम मोदींच्या आवाहनानंतर फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक; मंत्रालयात वेगवान घडामोडी; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

Maharashtra government decisions News : मंत्रालयात बुधवारी सकाळपासूनच बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यामुळे कॅबिनेट बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार कोणता मोठा निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसापूर्वीच देशाला काटकसर आणि बचतीची त्रिसूत्री सांगितली. त्यानंतर देशभरात वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यातच आता पीएम मोदी यांनी आवाहन केल्यानंतर राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार खडबडून जागे झाले आहे. बुधवारी कॅबिनेटची बैठक होत असतानाच मंत्रालयात वेगवान घडामोडी घडत आहेत. मंत्रालयात बुधवारी सकाळपासूनच बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यामुळे कॅबिनेट बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार कोणता मोठा निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसापूर्वीच देशाला बचतीची त्रिसूत्री सांगितली. त्यामध्ये पेट्रोल-डिझेलची बचत करावी. सोने एक वर्षे खरेदी करू नये आणि खाद्यतेलाचा वापर कमी करावा, असे आवाहन मोदी यांनी केले. त्यामुळे आता राज्य सरकारकडून या बचतीच्या त्रिसूत्रीची अमंलबजावणी करीत असताना बुधवारी होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठीकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारकडून काटकसर केली जाणार असून येत्या काळात राज्यातील सर्व मंत्र्यांचे वाहनताफे अर्ध्यावर आणले जाण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक घेणार आहेत. पोलिस महासंचालक, मुख्य सचिव या बैठकीला उपस्थित असतील. सुरक्षेशी तडजोड न करता ताफ्यातील वाहनसंख्येवर मर्यादा आणण्यात येणार आहे. सर्व मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर येणार आहे. यावर गांभीर्याने विचार करण्यात येणार आहे. विचाराअंती एकत्रित निर्णय बैठकीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.

त्यासोबत राज्य सरकारकडून बचत करण्यावर भर दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी किंवा प्रशासनाला बैठकाला न बोलावणे, ऑनलाइन संवाद करणे, असे उपाय योजण्यास सुरुवात आम्ही केली आहे. पुन्हा एकदा निर्देश देऊ, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. माझ्याकडे दोनच गाड्या आहेत. सुरक्षा यंत्रणेने त्यापैकी कमी करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी यांच्या सूचनांचे प्रत्येकानेच पालन केलेच पाहिजे, असेही ते म्हणाले.

पीएम नरेंद्र मोदींनी देशहितासाठी चांगला निर्णय घेत जनतेला प्रतिसाद दिला आहे. प्रमुखाने सांगितल्याने नैतिक जबाबदारी आमची ठरते. मी ईव्ही कारमधून प्रवास करण्याचा निर्णय केला आहे. मी जपानचा दौरा रद्द केला, अध्यक्षांनी देखील सांगितलं दौरा रद्द आपण केला आहे, अशी माहिती भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या बचतीच्या आवाहनाला नेत्याकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी इलेक्ट्रिक कार वापरण्यास सुरवात केली. मंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष कृतीतून त्यांची अंमलबजावणी केली. सांगलीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा नियोजन समिती सभेसाठी ई-बाईकवर जाणे पसंत केले. आपल्या समर्थकांसहित आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही बाईकवरून जिल्हा नियोजन समिती सभेसाठी रवाना झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT