Union Budget : गिरीश महाजन बजेटवर खुश! म्हणाले, अकरा वर्षात असे बजेट झाले नव्हते!

Girish Mahajan On budget : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मात्र भाजप आणि सत्ताधारी पक्षाने त्याचे जोरदार स्वागत केले आहे.
Union budget news
Union budget newssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला.

  2. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या अर्थसंकल्पाचे तोंडभरून कौतुक केले.

  3. महिलांसह प्रत्येक नागरिकाला या अर्थसंकल्पाचा मोठा लाभ होणार असल्याचा दावा करण्यात आला.

Girish Mahajan News : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे तोंड भरून कौतुक केले आहे. यापूर्वी कधीही एवढा उत्तम आणि सर्वांचा विचार करणारा अर्थसंकल्प सादर झाला नव्हता. प्रत्येक नागरिकाला आणि विशेषतः महिलांना त्याचा मोठा लाभ होणार आहे

जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले विकसित भारताच्या दृष्टीने आज संसदेत महत्त्वाचा अर्थसंकल्प मांडला. त्यात देशाच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तम तरतुदी करण्यात आल्या. विशेषतः गरीब आणि सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी हा अर्थसंकल्प आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद नसते. मात्र कुंभमेळ्याच्या विकास कामांसाठी आपण जे जे सरकारकडे मागितले ते त्यांनी आधीच दिले आहे. राज्य शासनाच्या तिजोरीतून सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. केंद्र सरकार देखील त्याला निश्चितच मदत करील, विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

Union budget news
Girish Mahajan Politics: जळगावचा महापौर कोण?बिनविरोध झालेल्या भाजपच्या या नगरसेविकेचे नाव जवळपास निश्चित, केवळ औपचारिकता बाकी!

आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात नागरिकांच्या सर्व इच्छा व्यक्त झाल्या आहेत. ती अर्थमंत्र्यांनी प्रत्येकाचा विचार करून योजना सादर केल्या. त्यामुळे या अर्थसंकल्पाने सामान्य नागरिकांना निश्चितच दिलासा मिळेल.

केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात महिलांचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध सुविधा आणि सवलती देण्यात आल्या. आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी महिलांना रोजगार आणि उद्योगांसाठी मोठी चालना देणारा अर्थसंकल्प आहे.

हा अर्थसंकल्प सर्वांना उपयोगी पडणारा आहे. यामध्ये ऊर्जा निर्मितीवर विशेष भर देण्यात आला आहे. सौर ऊर्जा आणि अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राला चालना देण्यात येईल. त्याचा लाभ थेट शेतकरी आणि ग्रामीण भागाला पुरेशी आणि स्वस्त वीज मिळेल.

दहा वर्षांपूर्वी वीज मिळत नव्हती. आता अनेक बदल झाले आहेत. येत्या काही वर्षात आपण ऊर्जा निर्मिती स्वयंपूर्ण होऊ. त्याच्या राष्ट्रांनाही वीज पुरवठा करण्याची क्षमता निर्माण होईल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

Union budget news
Girish Mahajan Politics: धक्कादायक; सत्तेच्या सौद्यात अर्थखात्याचा बळी? राष्ट्रवादीकडून भाजपला, अजित पवारांचं खातं ‘गिफ्ट’!

FAQs :

1. केंद्रीय अर्थसंकल्प कोणी सादर केला?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला.

2. अर्थसंकल्पावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया काय आहे?
हा आतापर्यंतचा सर्वात उत्तम आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

3. या अर्थसंकल्पाचा फायदा कोणाला होणार आहे?
प्रत्येक नागरिकाला आणि विशेषतः महिलांना मोठा फायदा होणार आहे.

4. अर्थसंकल्पाबाबत भाजप नेत्यांची भूमिका काय आहे?
भाजप नेत्यांकडून अर्थसंकल्पाचे कौतुक करण्यात येत आहे.

5. हा अर्थसंकल्प का महत्त्वाचा मानला जात आहे?
सर्व घटकांचा विचार करणारा आणि महिला केंद्रित असल्यामुळे तो महत्त्वाचा मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com